शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

दुरुस्तीअभावी रावढळ पुलाला तडे

By admin | Updated: December 25, 2014 22:14 IST

म्हाप्रळ - पंढरपूर राज्यमार्गावरील रावढळ गावाजवळ असलेल्या नागेश्वरी नदीवरील पूल जीर्ण झाला आहे. पुलाच्या बांधकामाला तडे गेले

दासगाव : म्हाप्रळ - पंढरपूर राज्यमार्गावरील रावढळ गावाजवळ असलेल्या नागेश्वरी नदीवरील पूल जीर्ण झाला आहे. पुलाच्या बांधकामाला तडे गेले आहे तर अनेक ठिकाणी पुलाचे कपचे उडाल्याने हा पूल धोकादायक बनला आहे. यामुळे या पुलाची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिक व वाहनचालक करीत आहेत. म्हाप्रळ-पंढरपूर राज्यमार्गाचे काम झाले तेव्हा रावढळ गावाजवळ पूल बांधण्यात आला. येथील खाडीतील रसायनयुक्त खारे पाणी, पावसाळ्यात नागेश्वरी नदीला येणाऱ्या पुराचे पाणी आणि डोंगरातून वाहत येणाऱ्या नागेश्वरी नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग यामुळे हा पूल आता जीर्ण होत चालला आहे. अनेक ठिकाणी पुलाला तडे गेले आहेत. पुलाच्या खांबांचे कपचे उडाले आहेत. या नादुरुस्तीमुळे आर.सी.सी. पद्धतीच्या या खांबातील लोखंडी सळ्या गंजण्याचे प्रमाण वाढले आहे. म्हाप्रळ-पंढरपूर हा मार्ग कोकण आणि घाटाला जोडणारा मार्ग आहे. महाडच्या खाडी पट्ट्यातील ग्रामस्थ महाडमध्ये येण्यासाठी याच मार्गाचा प्रामुख्याने वापर करतात. त्यामुळे हा मार्गावर कायम वाहनांची वर्दळ असते. या परिसरात मोठ्या प्रमाणावर वीट आणि वाळू वाहतूक होत असल्याने अवजड वाहनांचीही कायम वर्दळ असते. या पुलावरुन पावसाळ्यात नदीच्या पुराचे पाणी देखील जाते. यामुळे पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक देखील ठप्प होते. महाड-म्हाप्रळ मार्ग ज्यावेळी झाला त्यावेळी या पुलाची उभारणी करण्यात आली आहे. तिथपासून आजतागायत या पुलाची मोठी दुरुस्ती करण्यात आलेली नाही. काळाच्या ओघात हा पूल आता जीर्ण होत चालला असून तो धोकादायक बनत आहे. (वार्ताहर)