शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन लसीकरण नोंदणी सुविधेचा स्थानिकांना फटका, बाहेरील लोकांनाच मिळतोय लाभ : नागरिकांमध्ये मोठी नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 08:07 IST

वाडा, कुडुस, कंचाड येथे शनिवारपासून १८ ते ४४ या वयोगटासाठी केंद्र सुरू केली आहेत. मात्र ऑनलाइन नोंदणी केली जात असल्याने तालुक्याबाहेरील गर्दी जास्त प्रमाणात होत आहे. परिणामी स्थानिक लोक लसीकरणापासून वंचित राहतात.

वाडा  : १८ ते ४४ या वयोगटातील तरुण ऑनलाइन पद्धतीने लसीकरण सुविधांचा लाभ घेत असल्याने भिवंडी, वसई, ठाणे, मुंबई व गुजरातच्या काही भागातील तरुण येथे येऊन लसीकरण करून घेत असल्याने स्थानिक लोकांना लस न घेताच घरी परतावे लागत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे.वाडा, कुडुस, कंचाड येथे शनिवारपासून १८ ते ४४ या वयोगटासाठी केंद्र सुरू केली आहेत. मात्र ऑनलाइन नोंदणी केली जात असल्याने तालुक्याबाहेरील गर्दी जास्त प्रमाणात होत आहे. परिणामी स्थानिक लोक लसीकरणापासून वंचित राहतात. यामुळे स्थानिक व बाहेरील वाद निर्माण झाला आहे. कर्मचाऱ्यांनाही भांडण आवरणे मुश्कील झाल्याने पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटवले व बाहेरच्या लोकांना परत पाठवले.कंचाड केंद्रात १०० पैकी स्थानिक फक्त ३ लोकांना लाभ मिळाला. यामुळेच लोक चिडले. हे प्रकार जास्त प्रमाणात झाले. आता स्थिती चांगली आहे. बाहेरून येणाऱ्यांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. यामुळे स्थानिकांना संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, जिल्हा परिषद शाळा कुडूस हे लसीकरण केंद्र लोकवस्तीच्या ठिकाणी असल्याने तेथे लसीकरणासाठी नागरिक खूप गर्दी करत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे केंद्र लोकवस्तीपासून दूर घेण्याची मागणी येथील ग्रामस्थ रिदवान पटेल यांनी केली आहे.

वाडा शहरातील रहिवाशांनी योग्य सहकार्य केल्याने या केंद्रावरील लसीकरण सुरळीत सुरू आहे .मात्र कुडूस आणि कंचाड केंद्रावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याने व स्थानिक नागरिक सहकार्य करत नसल्याने ही दोन केंद्रे बंद करण्यात आली आहेत.- संजय बुरपुले, तालुका आरोग्य अधिकारी 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसVasai Virarवसई विरारcorona virusकोरोना वायरस बातम्या