शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : राष्ट्रवादीचा ‘विक्रम’गड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 06:08 IST

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विक्रमगड मतदारसंघात पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आणत राष्ट्रवादी- महाआघाडीचे उमेदवार सुनील भुसारा यांनी २१ हजार ३९९ मतांनी विजय मिळवला आहे.

- हुसेन मेमनजव्हार : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विक्रमगड मतदारसंघात पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आणत राष्ट्रवादी- महाआघाडीचे उमेदवार सुनील भुसारा यांनी २१ हजार ३९९ मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार आणि माजी आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांचे सुपुत्र डॉ. हेमंत सवरा यांचा पराभव केला. तब्बल ४२ वर्षांनी काँग्रेस - राष्ट्रवादी महाआघाडीने येथे विजय प्राप्त केला आहे. यावेळी महाआघाडीच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी फटाके फोडीत, गुलाल उधळत आणि विजयी घोषणा देऊन लाडू आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला आहे.

राष्ट्रवादीच्या सुनील भुसारा यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच मतांची आघाडी घेण्यास सुरुवात केली होती. ती २५ व्या फेरीपर्यंत कायम ठेवण्यात सुनिल भुसारा यांनी यश मिळवले आहे. सुनिल भुसारा यांना एकूण ८८ हजार ४२५ मते मिळाली आहेत. तर पराभूत उमेदवार डॉ. हेमंत सवरा यांना ६७ हजार २६ मते मिळाली असून भुसारा यांनी २१ हजार ३९९ मताधिक्याने विजय मिळवला आहे.

या निवडणुकीत स्थानिक विरूध्द परकीय हा मुद्दा मतदारांपुढे पोहोचिवण्यात राष्ट्रवादी यशस्वी ठरले. तर भाजप आणि शिवसेनेतील नाराज गटानेही सुनील भुसारा यांना मदत केल्याचे प्रत्येक तालुक्यातील मतांची आघाडी सांगते आहे. भुसारा यांनी जव्हारमधून १३ हजार तर मोखाड्यातून ८ हजार मताधिक्य घेतले आहे. तर भाजपचा अभेद्य असलेला गड विक्रमगड तालुका आणि वाडा तालुक्यातील कंचाड जिल्हा परिषद गटातही भाजपला रोखून धरत भुसारा यांनी ही आघाडी मिळविली आहे.

विशेष म्हणजे, भुसारा यांनी या संपूर्ण मतदारसंघात एकाही मोठ्या नेत्याची सभा घेतली नाही. पक्षाध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे खा. अमोल कोल्हे आणि बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्या सभांचे नियोजन असूनही भुसारा यांनी सभांमध्ये वेळ तसेच पैसा न दवडता विकासाचा आणि स्थानिक विरूद्ध परकीय उमेदवाराच्या प्रचारावर भर दिला. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून सवरा कुटुंबाला असणारा विरोध प्रकर्षाने जाणवला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019vikramgad-acविक्रमगडNCPराष्ट्रवादी काँग्रेस