शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांना पेट्रोल-डिझेल देणाऱ्या पेट्रोलपंप मालकाविरुद्ध माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 17:03 IST

वाहन चालकांनाच पेट्रोल -डिझेल पंप मालक व त्यांच्या व्यवस्थापनाने चौकशी करून पेट्रोल डिझेल विक्री करण्याचे आदेश पालघर जिल्हाधिकारी यांनी बुधवारी पारित केले आहेत.

- आशिष राणे

वसई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल-डिझेल पंपावर होणारी गर्दी टाळण्यासाठी पालघर जिल्ह्यात केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नोंदणीकृत वाहन चालकांनाच पेट्रोल -डिझेल पंप मालक व त्यांच्या व्यवस्थापनाने चौकशी करून पेट्रोल डिझेल विक्री करण्याचे आदेश पालघर जिल्हाधिकारी यांनी बुधवारी पारित केले आहेत. या प्रकरणी तसे आदेश 8 एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप मालकांना खासगी वाहन चालकांना पेट्रोल, डिझेल विक्री मनाई करण्यात आली आहे, दरम्यान जिल्हाधिकारी यांचा आदेश झुगारून वसईत माणिकपूर नाक्यावरील बसीन पेट्रोल पंपावर खासगी वाहनांसाठी पेट्रोल-डिझेलची विक्री गुरुवारी देखील सर्रास सुरू असल्याचे प्रत्यक्ष पोलिसांच्या निदर्शनास आल्यावर जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या माणिकपूर येथील बसीन पेट्रोल पंप मालक, मॅनेजर आणि पंपावरील कामगार यांच्या विरुद्ध माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. 147/2020 नुसार विविध कलमानव्ये गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पालघर पोलीस  अधीक्षक यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यात पेट्रोल पंपावर मोठया प्रमाणावर गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी पालघर यांनी तसे विक्री मनाई आदेश देण्यात आले होते.

100 रुपयांची पेट्रोल विक्री भोवली !

जिल्हाधिकारी पालघर यांनी बुधवार 8 एप्रिल रोजी सर्व पेट्रोल-डिझेल पंपधारकांना अत्यावश्यक सेवा वाहन सोडून इतर खासगी वाहनांसाठी विक्री बंद करण्याचे आदेश काढले, या आदेशानुसार वसई उपअधीक्षक कार्यालयातील पोलीस नाईक राहुल कसबे यांना माणिकपूर पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेलची विक्री सुरू असल्याचे समजलं व  त्यांनी माणिकपूर पेट्रोल पंप येथे येऊन एका कामगारांकडून 100 रुपये देऊन आपल्या दुचाकीत पेट्रोल भरून घेतले, तेव्हा लक्षात आले की, इथे खासगी वाहनचालकांची चौकशी न करताच पेट्रोल डिझेलची विक्री होत आहे. हे स्पष्ट झाल्यावर फिर्यादी पोलीस नाईक राहुल कसबे यांनी गुरुवार 9 एप्रिल रोजी संध्याकाळी माणिकपूर पोलीस ठाण्यात उपस्थित राहून माणिकपूर पेट्रोल पंप मालक, मॅनेजर व कामगार यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस