शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट कुत्र्यांचा हैदोस

By admin | Updated: October 10, 2016 02:51 IST

पर्यटकांचे आकर्षण असलेल्या अर्नाळा समुद्रकिनारी सध्या सुमारे शंभर-दीडशे मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. यातील काही कुत्री पिसाळलेली असल्याने

वसई : पर्यटकांचे आकर्षण असलेल्या अर्नाळा समुद्रकिनारी सध्या सुमारे शंभर-दीडशे मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. यातील काही कुत्री पिसाळलेली असल्याने पर्यटकांच्या अंगावर धावून जात असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.मुंबईपासून अगदी जवळ असलेल्या अर्नाळा समुद्रकिनारी सध्या पर्यटकांची गर्दी असते. मात्र, समुद्रकिनाऱ्यावर जाणाऱ्या मार्गावरच असलेल्या डम्पिंंग ग्राउंडमुळे किनारा अस्वच्छ झाला आहे. प्रचंड दुर्गंधी आणि घाणीच्या साम्राज्यामुळे गावकऱ्यांसह पर्यटकही त्रस्त झाले आहेत. ही घाण ओलांडून गेल्यानंतर समुद्रकिनाऱ्याची मौजमजा लुटणाऱ्या पर्यटकांना आता मोकाट कुत्र्यांपासून सावध राहावे लागत आहे.सध्या किनाऱ्यावर शंभर-दीडशे मोकाट कुत्री फिरत आहेत. यातील काही पिसाळलेली आहेत. ही कुत्री पर्यटकांच्या अंगावर धावून जात असतात. कुत्र्यांचा काहीच बंदोबस्त केला जात नसल्याने मोकाट कुत्र्यांची संख्या वाढताना दिसत आहे. समुद्रकिनारी असलेल्या रिसॉर्टमध्ये उरलेल्या अन्नाचा कचरा समुद्रकिनारी आणून टाकला जातो. तसेच समुद्रकिनारी पहाटेपासून येथील लोक शौचास बसत असतात. कुत्र्यांना त्यामुळे खाण्याची आयतीच सोय होत असल्याने समुद्रकिनारी मोकाट कुत्र्यांची संख्या वाढून त्यांचा वावर सुरू झाला आहे. पालिका हद्दीतील मोकाट कुत्री पकडून या ठिकाणी साडली जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. (प्रतिनिधी)