शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

चाळीचे छत कोसळून झोपेतच चौघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:22 IST

सातपाटीमध्येही पडझड : पंचनामे पूर्ण

पालघर : पालघरच्या दांडेकर कंपाउंडमधील एका चाळीचे छत पहाटे कोसळल्याने गाढ झोपेत असलेल्या विमावाला कुटुंबातील ४ लोक जखमी झाले तर दुसऱ्या एका घटनेत मध्यरात्री सातपाटीमधील एका घराची भिंत कोसळून दोघे जखमी झाल्याची घटना घडली.पालघर - माहीम रस्त्यावरील लक्ष्मी नारायण मंदिरासमोरील दांडेकर कंपाउंड या खूप वर्षांपूर्वीच्या चाळीचे छत मंगळवारी अचानक कोसळले. यावेळी घरात गाढ झोपेत असलेल्या नंदकिशोर चंद्रकांत विमावाला (६७) या रुग्णाच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्या पत्नी कल्पना विमावाला (६२), तसेच निपेश (३६) आणि त्याचा भाऊ जिगर (३४) हे चौघेही जखमी झाले. त्यांना प्रथम पालघरच्या ग्रामीण आणि नंतर खाजगी रु ग्णालयात दाखल केले.

अन्य एका घटनेत सातपाटी येथील अग्निमाता गणेशोत्सव मंडळात राहणारे विष्णू गोविंद पाटील (८५) यांच्या घराची भिंत तसेच छप्पर मध्यरात्री कोसळून ते स्वत: आणि त्यांची मुलगी वंदना (५५) हे दोघेही जखमी झाले. दोन्ही घटना मुसळधार पाऊस सुरू असताना घडल्या. दोन्ही घरातून मदतीसाठी हाका ऐकून शेजारच्यांनी त्यांची मदत करीत त्यांना या संकटातून बाहेर काढले. पालघरचे मंडळ अधिकारी वसावे यांनी दोन्ही घटनास्थळी जाऊन पंचनामे केले असून शासन पातळीवरून मदत मिळण्याबाबत प्रस्ताव पाठविला असल्याचे लोकमतला सांगितले.

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारRainपाऊस