शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
4
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
5
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
6
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
7
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
8
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
9
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
10
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
11
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
12
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
13
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
14
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
15
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
16
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
17
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
18
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

अखेर सूनच बनली तिचा मुलगा... सासूवर केले रीतसर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 12:02 AM

२० वर्षे केला सांभाळ : कोरोनामुळे नातेवाईक पोहोचू शकले नाही

लोकमत न्यूज नेटवर्कमनोर  : मुंबई - अहमदाबाद महामार्ग जवळील दहिसर तर्फे मनोर येथे वृद्धापकाळाने निधन झालेल्या सासूवर सुनेलाच अंत्यसंस्कार करावे लागले. कोरोनामुळे नातेवाईक येऊ न शकल्याने सासूला सुनेनेच मुखाग्नी दिला. २० वर्षे सांभाळ करून शेवटी अंत्यसंस्कार ही केल्याने तिचे पालघर जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.अलीकडच्या काळात सासू आणि सुनाचे अजिबात न पटण्याचे प्रकार सर्वत्र घडत असतात, मात्र अंथरुणास खिळलेल्या सासूचा सुनेने सांभाळ करतानाच अंत्यसंस्कार ही पार पाडून नीता गोडांबे या सुनेने समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. सासू ताराबाई गोडांबे यांचे मंगळवारी वृद्धापकाळने निधन झाले. काेरोनामुळे नातेवाईक अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नाहीत. पाटबंधारे खात्यात नोकरी करणारे नीता यांचे पती नंदकुमार यांचे २० वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांना अपत्य नसल्याने नंदकुमार गोडांबे यांच्या निधनानंतर त्यांची वयोवृद्ध आई ताराबाई यांचा नीता सांभाळ करीत होत्या.मंगळवारी ताराबाई गोडांबे यांचे निधन झाले. ताराबाई यांच्या नातेवाईकांनी ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातून दहिसर गावात अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकत नसल्याचे कळवले होते. त्यामुळे मयत ताराबाई यांच्यावर अंत्यसंस्कार कोण करणार, हा प्रश्न निर्माण झाला होता.         अखेरीस ताराबाई यांच्या सूनबाई नीता गोडांबे यांनी पुढाकार घेत चितेला मुखाग्नी देण्याचा निर्णय घेतला. सर्व निर्बंधांचे पालन करीत नीता गोडांबे यांचे दोन भाऊ आणि ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला. नीता यांनी सासूचे अंत्यविधीचे सोपस्कार स्वत:हून पार पाडले.