शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पॅनकार्ड नसल्याने महिला बचत गटांची बिले रखडली

By admin | Updated: March 21, 2017 01:37 IST

महिला सबलीकरणासाठी वसई विरार महापालिकेने ८३ महिला बचत गटांना १३८ उद्यानांच्या देखभालीचे काम दिले आहे. मात्र,

वसई : महिला सबलीकरणासाठी वसई विरार महापालिकेने ८३ महिला बचत गटांना १३८ उद्यानांच्या देखभालीचे काम दिले आहे. मात्र, यातील अनेक बचतगटांकडे पॅनकार्ड नसल्याने गेल्या चार महिन्यांपासून त्यांची बिले थकली आहेत. परिणामी आर्थिक कोंडी झाल्याने शेकडो महिलांना कामाचा मोबदला मिळू शकलेला नाही.वसई विरार महापालिकेत बीपीएल आणि एपीएलअंतर्गत अडीचशेहून अधिक महिला बचत गट नोंदवले गेले आहेत. तसेच काही महिला बचत गट दारिद्रय रेषेखालील असून सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजने अंतर्गत स्थापन झालेले आहेत. महापालिकेत नोंदणी झालेल्या २५० पैकी ८३ महिला बचत गटांना शहरातील ८३ उद्यानांचे देखभालीचे काम देण्यात आले आहे. सप्टेंबर २०१६ रोजी तसे करारनामे करण्यात आले होते. मात्र, कार्यादेश नोव्हेंबर २०१६ मध्ये देण्यात आले. करारनाम्यानुसार प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत त्यांच्या कामाचा मोबदला दिला पाहिजे. पण, पाच महिन्यांनी काही महिला बचत गटांना डिसेंबरपर्यंतचा मोबदला अदा करण्यात आला आहे. शेकडो महिलांना दरमहा मोबदला मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याची तक्रार भाजपाचे वसई शहर अध्यक्ष मारुती घुटूकडे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. महिला बचत गटात घरकाम, मोलमजुरी करणाऱ्या गरीब घरातील महिला आहेत. त्यांंनी आपापली कामे सोडून बचत गटाच्या माध्यमातून उद्यान देखभालीचे काम हाती घेतले आहे. पण, पाच महिने उलटल्यानंतर महापालिकेने बचत गटांना पॅनकार्ड जमा केल्यानंतर मोबदला दिला जाईल असे सांगून बिले थकवली आहेत. ठराविक महिला बचत गटांकडेच पॅनकार्ड आहेत. बऱ्याच बचत गटांकडे ते नसल्याने त्यांची बिले थकली आहेत.सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजने अंतर्गत स्थापन झालेल्या बचत गटांना नोंदणी प्रमाणपत्र मिळालेले नसल्याने त्यांना पॅनकार्ड मिळणे कठीण झाले आहे. त्यांची आर्थिकक कोंडी झाल्याची तक्रार आहे. दरम्यान, महिला बचत गटांना पॅनकार्ड काढण्यासाठी मदत केली जात आहे. त्यामुळे अनेक गटांना पॅनकार्ड मिळू लागली आहेत. (प्रतिनिधी)