CoronaVirus News : वसईत १२ दिवसांत ६ हजार ५०४ नवीन रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 23:43 IST2021-04-12T23:35:02+5:302021-04-12T23:43:07+5:30

CoronaVirus News : दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने शहराची चिंता अधिक वाढू लागली आहे.

CoronaVirus News: 6 thousand 504 new patients in 12 days in Vasai | CoronaVirus News : वसईत १२ दिवसांत ६ हजार ५०४ नवीन रुग्ण

CoronaVirus News : वसईत १२ दिवसांत ६ हजार ५०४ नवीन रुग्ण

वसई : वाढत्या रुग्णसंख्येमुळे वसई-विरार शहरातील कोरोनाचा कहर अधिक गडद बनू लागला आहे. एप्रिल महिन्यात रुग्णवाढीचा वेग चार ते पाच पटीने वाढला आहे. सोमवारी वसईत ४९२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून दि. १ ते १२ एप्रिल दरम्यान तब्बल ६ हजार ५०४ वीन रुग्ण आढळून आले आहेत, तर या १२ दिवसांत २० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच केवळ २ हजार ४२२ रुग्ण आजवर मुक्त झाले आहेत.
दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने शहराची चिंता अधिक वाढू लागली आहे. दरम्यान, मार्च महिन्यात दिवसाला सरासरी १०० रुग्ण आढळून येत होते. 

Web Title: CoronaVirus News: 6 thousand 504 new patients in 12 days in Vasai