शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनाचा शेतकऱ्यांना फटका, टोमॅटोला कवडीमोलाचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 16:16 IST

Coronavirus : लाॅकडाऊनमुळे मार्केट बंद झाल्याने दर्ज्जेदार पिक येवूनही माल विक्रीसाठी बाजारात जात नसल्याने ही टोमॅटो शेतात सडू लागले आहेत. 

 

वाडा - वाडा तालुक्यात या वषी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी टोमॅटोची शेती केली असून त्यात उत्पन्न ही भरपूर आले आहे. मात्र  लाॅकडाऊनमुळे मार्केट बंद झाल्याने दर्ज्जेदार पिक येवूनही माल विक्रीसाठी बाजारात जात नसल्याने ही टोमॅटो शेतात सडू लागले आहेत. टोमॅटो शेती करण्यासाठी सेवासहकारी सोसायट्यांकडून रब्बी पिकासाठी घेतलेले कर्ज फेडणार कसे या चिंतेने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.

तालुक्यातील देवघर ,बुधावली, गुंज,काटी, सारसी, या गावातील सुमारे १०० शेतकऱ्यांनी ८०० एकर शेतजमीनीत टोमॅटोची शेती केली असून त्यात पीकही चांगल्याप्रकारे आले आहे. जेव्हा केव्हा नवी मुंबई येथील वाशी मार्केर्ट चालू असेल तेव्हाच फक्त दोन ते तीन व्यापारी येथे टोमॅटो खरेदीसाठी येतात ते पण सर्वच शेतकऱ्यांचा माल उचलत नाहीत. ज्या शेतकऱ्यांचा टोमॅटो घेतात तोपण काटीमोल भावाने एक नंबरचा टोमॅटो 3 रूपये किलो दराने तर दोन नंबरचा टोमॅटो 2 रूपये दराने व तीन नंबरचा टोमॅटो फेकून दिला जातो. त्यामुळे अशा मातीमोल दराने विक्री झाली आणि बाकीचे टोमॅटो शेतातच सडू लागली आहेत. त्यामुळे टोमॅटो शेतीचा यशस्वी पयोग करूनही आजच्या घडीला शेतकरी अडचणीत सापडत आहे.

वाड्यातील शेतकऱ्यांना भातपीकाला पर्याय म्हणून टोमॅटोची उत्तम प्रकारे शेती केली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून टोमॅटो उत्पादनात गेल्या अनेक वर्षांपासून आपला लौकीक कायम राखला आहे. मात्र या वर्षीही उत्पादन चांगले आले आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे उत्पादन अडचणीत सापडले आहे. त्यामुळे टोमॅटोची खरेदी आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून व्हावी अशी मागणी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

सध्या राज्यात कोरोनाचे संकट ओढावल्याने सर्वत्र ताळेबंदी सुरू आहे. त्यामुळे शेतात पिकलेला टोमॅटो विकला जात नसल्याने तो शेतातच सडू लागला आहे. त्यामुळे टोमॅटो शेतीसाठी घेतलेले सोसायटीचे रब्बी कर्ज फेडणार कसे या चिंतेत येथील शेतकरी सापडला आहे. त्याला सावरण्यासाठी  सरकारची मदत मिळावी अन्यथा यातून बाहेर पडणे कठीण.

- किशोर पाटीलटोमॅटो उत्पादक शेतकरी-देवघर

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : कोरोना आता लपू शकणार नाही, 'हे' सॉफ्टवेअर फक्त काही सेकंदात शोधणार, वैज्ञानिकाचा दावा

Coronavirus : लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन जेवण मागवणं पडलं महागात, बसला तब्बल 50 हजारांचा फटका

Coronavirus : भाषणाआधी पंतप्रधान मोदींनी केलं ट्विट, म्हणाले...

Coronavirus : 'देशाला स्मार्ट उपायांची गरज', राहुल गांधींचा मोदींना सल्ला

Coronavirus : चिंताजनक! दिल्लीत एका दिवसात कोरोनाचे ३५६ नवे रुग्ण, देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ९३५२ वर

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरीagricultureशेती