केळवा बीचवर चार पर्यटकांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 17:21 IST2018-06-17T17:13:05+5:302018-06-17T17:21:54+5:30

पाण्याचा अंदाज न आल्यामुळे यापैकी चार जण खोल समुद्रात गेले.

4 peoples died on Kelva beach | केळवा बीचवर चार पर्यटकांचा बुडून मृत्यू

केळवा बीचवर चार पर्यटकांचा बुडून मृत्यू

मुंबई: पालघर तालुक्यातील केळवे बीचवर रविवारी पर्यटनासाठी आलेल्या नालासोपारा येथील चार पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून उर्वरित तिघांचे मृतदेह शोधण्याचे काम अजून सुरू आहे. दिपक परशुराम चालवाडी (वय 20), दिपेश दिलीप पेडणेकर (वय 17) , श्रीतेज नाईक (वय 15), तुषार चिपटे (वय 15), अशी मृतांची नावे आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळपासून पाऊस पडत असल्यामुळे केळवे बीचवर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यामध्ये नालासोपाऱ्यात राहणाऱ्या सात जणांचा एका ग्रूपचाही समावेश होता. हे सर्वजण खवळलेल्या समुद्रात उतरले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे यापैकी चार जण खोल समुद्रात गेले. सर्वांना याची कल्पना येईपर्यंत फार उशीर झाला होता. या घटनेनंतर तातडीने बचावकार्य हाती घेण्यात आले. परंतु, या चौघानांही वाचवण्यात अपयश आले.

Web Title: 4 peoples died on Kelva beach