शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

राेहयाे मजुरांचे 14.57 काेटी थकीत; निधीअभावी योजनेला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 23:10 IST

उपासमारीमुळे आदिवासींवर स्थलांतराची वेळ

रवींद्र साळवेमोखाडा : ‘मागेल त्याला काम आणि १५ दिवसांत दाम’ या तत्त्वावर आधारलेल्या व स्थानिक पातळीवर रोजगाराची हमी देणाऱ्या रोहयो योजनेला निधीअभावी ब्रेक लागला आहे. जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड येथील रोहयोंतर्गत काम केलेल्या मजुरांची १४ कोटी ५७ लाखांची थकबाकी केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळाली नसल्याने ‘रोजगार हमी योजना’ धोक्यात आली आहे. केंद्राकडून आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्याने त्यातच  संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.

 कोरोनाच्या काळात आदिवासींना स्थानिक पातळीवर रोजगारांना संजीवनी देणारी ही योजना शासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे आदिवासींच्या स्थलांतराला कारणीभूत ठरणार आहे.  जिल्ह्यात शेल्फवर मुबलक प्रमाणात कामे असून ९५ टक्के कामगारांना मागणी केल्यानंतर आठवडाभरात काम देण्यात येते, अशी स्थिती राहिली आहे.

जिल्ह्यातील दोन महिन्यांपासून केंद्र शासनाकडून आवश्यक निधी मिळत नसल्याने काम केलेल्या कामगारांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत नसल्याचे दिसून आले आहे. तसेच, मनरेगाच्या संकेतस्थळावर तांत्रिक अडचणींमुळे डिजिटल स्वाक्षरी अपलोड हाेत नसल्याचे त्यामागे कारण असल्याचे सांगण्यात येते. पालघर जिल्ह्यात हजारो मनरेगा कामगारांचे कोट्यवधी रुपये थकीत आहेत. कामाचा मोबदला मिळत नसल्याने योजनेंतर्गत कामगारांमध्ये नाराजी आहे.

तसेच, रोजगार हमीवर काम करणारी सर्व कुटुंबे ही दारिद्र्यरेषेखालील असून मजुरी न मिळाल्याने यापैकी अनेक कुटुंबांवर कठीण प्रसंग ओढवला असल्याचे दिसून येते.  विक्रमगड तालुक्यात जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांच्या कालावधीत ‘रोजगार हमी योजने’चे ७ कोटी ८१ लाख ३५ हजार ४२३ रुपये, जव्हार तालुक्यात ४ कोटी ५६ लाख ७७ हजार ६४ रुपये, तर मोखाडा तालुक्यात दाेन कोटी १९ लाख ५३ हजार ८३३ रुपये मजुरी प्रलंबित आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार