शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचाराचा दोन ते अडीच वर्षानंतर मिळतोय परतावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 05:00 IST

जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून वैद्यकीय उपचाराचा परतावा मिळण्याकरिता कार्यरत असलेल्या विभागाकडे प्रस्ताव पाठविले जातात. सुरुवातीला कागद पत्रांची पूर्तता करतांनाच मोठ्या अडचणी येतात. त्यानंतरही प्रस्ताव चार टेबलांवर जात असल्याने मोठा कालावधी जातो. मंजुरी मिळाल्यावरही निधीअभावी कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांना दफ्तर दिरंगाईचा फटका

 लाेकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासकीय कर्मचाऱ्यांच्या परिवारातील सदस्यांना शासनाकडून वैद्यकीय उपचारांचा परतावा दिला जातो. पण, प्रस्ताव सादर केल्यानंतर कर्मचाऱ्यांना तब्बल दोन ते अडीच वर्षांपर्यंत बिलच मिळत नसल्याचा प्रकार जि.प. मध्ये दिसून आला आहे. जि.प. अंतर्गत आठही तालुक्यामध्ये जवळपास ५ हजार ५०० अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यात सामान्य प्रशासन, समाज कल्याण, शिक्षण, पशुसंवर्धन, पंचायत, महिला व बालकल्याण, वित्त व लेखा, आरोग्य, लघू सिंचन, कृषी, बांधकाम व पाणीपुरवठा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या विभागातील कर्मचाऱ्यांनी परिवारातील सदस्याच्या किंवा स्वत: च्या वैद्यकीय  उपचाराच्या परताव्यासंदर्भात प्रस्ताव सादर केल्यानंतर विविध कारणांमुळे दोन ते अडीच वर्षे परतावा मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो.

मंजुरीनंतरही राहतोय निधीचा अभावजिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून वैद्यकीय उपचाराचा परतावा मिळण्याकरिता कार्यरत असलेल्या विभागाकडे प्रस्ताव पाठविले जातात. सुरुवातीला कागद पत्रांची पूर्तता करतांनाच मोठ्या अडचणी येतात. त्यानंतरही प्रस्ताव चार टेबलांवर जात असल्याने मोठा कालावधी जातो. मंजुरी मिळाल्यावरही निधीअभावी कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते.जिल्हा परिषदमध्ये कार्यरत काही कर्मचाऱ्यांनी स्वत: च्या किंवा परिवारातील सदस्यांच्या वैद्यकीय उपचाराच्या परताव्या संदर्भात प्रस्ताव सादर केला आहे. काहींना तब्बल अडीच वर्षानंतर परवातावा मिळाता तर काहींना दोन वर्ष लोटूनही परतावा मिळाला नाहीत. पण, कुणाकडूनही तक्रार नाही, हे विशेष.

बिलाकरिता फाईलचा चार टेबलांवरून प्रवासकर्मचाऱ्याला प्रारंभी तो कार्यरत असलेल्या विभागात प्रस्ताव सादर करावा लागतो. कागदपत्राची पडताळणी केल्यानंतर प्रस्ताव आरोग्य विभागात जातो. त्यानंतर वित्त विभागाकडून मंजुरी मिळाल्यावर बिल देण्याचा आदेश कार्यरत असलेल्या विभागास प्राप्त होतो.

कर्मचाऱ्यांना तात्काळ वैद्यकीय उपचाराचे बिल देण्याचा प्रयत्न असतो. पण, प्रस्ताव सादर करतांना कर्मचाऱ्यांनी कागदपत्रांची पुर्तता केलेली नसते. किंवा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर संबंधित विभागात निधीची कमतरता असते, त्यामुळे कधीकाळी विलंब होतो.                         - डॉ. सचिन ओम्बासे,                           मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :zpजिल्हा परिषदHealthआरोग्य