शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
5
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
6
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
7
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
8
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
9
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
10
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
11
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
12
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
13
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
14
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
15
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
16
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
17
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
18
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
19
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
20
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
Daily Top 2Weekly Top 5

रोखरहित व्यवहारांना चालना देण्यासाठी कार्यशाळा

By admin | Updated: December 26, 2016 01:59 IST

नोटबंदीमुळे रोख रकमेचा तुटवडा व २००० रुपयांसारख्या मोठ्या नोटांमुळे व्यवहारात सुट्या पैशांची समस्या

विद्याभारती विद्यालयात विद्यार्थ्यांना माहिती सेलू : नोटबंदीमुळे रोख रकमेचा तुटवडा व २००० रुपयांसारख्या मोठ्या नोटांमुळे व्यवहारात सुट्या पैशांची समस्या निर्माण झाली. यामुळे सामान्यांना त्रास होत आहे. ही बाब लक्षात घेत केंद्र सरकारने रोखरहित व्यवहारांना चालना देण्यासाठी उपक्रम राबविले. विद्याभारती विद्यालयातही विद्यार्थी व नागरिकांसाठी कार्यशाळा घेत कॅशलेस व्यवहारांबाबत माहिती देण्यात आली. याप्रसंगी डॉ. अजय पेठे यांनी रोख विरहीत व्यवहारांबाबत मार्गदर्शन केले. प्रामुख्याने रोखरहित व्यवहार म्हणजे काय, या व्यवहारांचे फायदे व गरज विषद केली. रोख विरहित व्यवहार करण्याच्या पाच पद्धतींवर प्रकाश टाकला. यात युनिफाईड पेमेंट इंटरफेस, ई-वॉलेट, कार्डस्, पीओएस, आधार सक्षम पेमेंट सिस्टीम व अविस्तृत पूरक सेवा माहिती यांचा समावेश होता. पाचही पद्धतीद्वारे रोख विरहित व्यवहार कसे पार पाडले जातात, याचे प्रात्यक्षिक दिले. रोख विरहित व्यवहार करणे ही काळाची गरज असून प्रत्येकाने या पद्धतीचा अवलंब करून सुरळीत व्यवहार करावे, असे आवाहनही त्यांनी केले. डॉ. नागदिवे यांनी वाणिज्य विभागाद्वारे कार्यक्रमाचे आयोजन केले. विशेष अभियान म्हणून सर्वांनी रोख विरहीत व्यवहाराला चालना देणे हे राष्ट्रीय कर्तव्य ठरते, असे मत प्राचार्य डॉ. संजय कानोडे यांनी व्यक्त केले. रोखरहित व्यवहारांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन केले. प्रास्ताविक डॉ. भास्कर घैसास, संचालन डॉ. नागदिवे यांनी केले तर आभार डॉ. पराग कावळे यांनी मानले. कार्यक्रमाला. प्रा. डंभारे, डॉ. निकम, हरिभाऊ, नारायण आदींनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)