शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

‘आम्ही दोघी माय लेकी’ स्पर्धा आज

By admin | Updated: December 22, 2016 00:27 IST

जगणे पुरे झाले जगवायचे आता, आयुष्य एकवार फुलवायचे आता, असे म्हणत आयुष्याचा आनंद घेणारे आणी

कलर्स व सखी मंचचे आयोजन : नात्याची वीण घट्ट करणारा कार्यक्रम वर्धा : जगणे पुरे झाले जगवायचे आता, आयुष्य एकवार फुलवायचे आता, असे म्हणत आयुष्याचा आनंद घेणारे आणी देणारे आमचे पालक आणि कुटुंबातील इतर ज्येष्ठ मंडळी. आपल्या मुलांना चांगले जीवन आणि भविष्य देण्यासाठी स्वत:च्या आवडी निवडी आणि गरजा बाजुला ठेवणारे पालक खरं तर आपल्या आयुष्याचा मुख्य पाया असतो. ज्यावर आमचे करिअर, भविष्य अवलंबून असते. त्यातही आईची भूमिका ही जास्त संवेदनशील असते. कर्तव्य आणि प्रेम याचा सुरेख संगम साधणे हे केवळ आईलाच जमते. हेच नेमके कलर्स प्रस्तुत ‘एक श्रृंगार.. स्वाभिमान’ या नवीन मालिकेतून प्रेक्षकांसाठी लोकमत सखी माध्यमातून सुंदर विषय आपल्या भेटीला येत आहे. स्थानिक रंजन सभागृह, वंजारी चौक, वर्धा येथे गुरूवारी दुपारी ४.३० वाजता हा कार्यक्रम होईल. यात लेकींसाठी विविध स्पर्धा होणार आहे. सुरुवातीला त्यांनी परिचय फेरीमध्ये एकमेकींचा परिचय करुन घ्यायचा आहे. त्यानंतर कलाविष्कार फेरी आणि परिस्थितीनुरुप निर्णयक्षमता व प्रश्नोत्तर फेरी होईल. आई व मुलीची एकमेकांप्रति असलेली बांधिलकी, जवळीक, त्यांच्या नात्यातील तरलता, एकमेकींना सांभाळण्याचे कसब या स्पर्धेत दिसून येईल. यातून मायलेकीचे नाते अजून घट्ट होईल. नात्यातील ओलावा जपणारा हा कार्यक्रम असून मनोरंजनात्मक गीत व नृत्याचे कार्यक्रम यावेळी सादर होतील. कलर्स चॅनेलवर १९ डिसेंबर २०१६ पासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता ‘एक श्रृंगार... स्वाभिमान’ ही आई व मुलींच्या घट्ट नात्यांवर आधारित मालिका सुरू होत आहे. या मालिकेत गणिताची शिक्षिका असणाऱ्या शारदाने तिच्या दोन मुलींना पुढारलेल्या विचारांसह स्वाभिमानाने जगण्याचा मंत्र दिला आहे. मुलींना कर्तृत्ववान बनविल्यानंतर तिची नौकरी आधी आणि घर नंतर या विषयावर काम शारदा समाजासमोर अनेक प्रश्न निर्माण करते. ज्यात नौकरी करणे म्हणजे फक्त अर्थार्जन नव्हे तर स्वाभिमानाने जगण्याचा तो एक मार्ग आहे, असे तिला सांगावे वाटते. घर सांभाळून नोकरी करणारी स्त्री आदर्श आणि नोकरीसाठी करिअरला जास्त महत्त्व देणारी स्त्री ही आदर्श का नाही असा प्रा्रमाणिक प्रश्न शारदा उपस्थित करते. तिच्या या सर्व प्रश्नांना काय उत्तरे आहेत हे या मालिकेत कळेलच. पण आम्ही दोघी मायलेकी या स्पर्धेतूनसुद्धा या विषयांवर प्रकाश टाकला जाईल. या स्पर्धेसाठी मायलेकींच्या जोड्या असणार आहे. यात मुलीचे वय कमीतकमी १० वर्षे असावे. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे. सखी मंच नेहमीच नवनवीन उपक्रम राबविते. महिलांकरिता नाविण्यपूर्ण विषय देण्याकरिता हा कार्यक्रम असणार आहे. बोचऱ्या थंडीत आई आणि मुलींच्या विविध स्पर्धा रंगतील. त्यांच्या नात्यातील वीण अधिक घट्ट होईल यात शंका नाही. माय-लेकीच्या पे्रमाचा कलर, एकमेकांचा स्वाभिमान जपण्याची धडपड या कार्यक्रमात बघण्यास मिळणार आहे. हा कार्यक्रम सर्व सखी मंच सदस्य व प्रेक्षकांसाठी खुला असून परिवारासहीत सदस्य आमंत्रित आहेत. अधिक माहिती प्रियंका मोहोड-९७६७७०४१२५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.(उपक्रम प्रतिनिधी)