शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

समन्वयाची शेती ठरली विकासाचा मार्ग

By admin | Updated: May 10, 2015 01:34 IST

तालुक्यातील रेहकी येथील दोन मावसभावांनी एकत्र येत समन्वयाने शेती करून विकासाचा मार्ग शोधला आहे.

सेलू : तालुक्यातील रेहकी येथील दोन मावसभावांनी एकत्र येत समन्वयाने शेती करून विकासाचा मार्ग शोधला आहे. या दोघांनी पाऊण एकरात थोडा थोडका नाही तर तब्बल सव्वा लाख रुपयांचा नफा मिळविला आहे. पंकज झाडे व श्रीकांत धानकुटे या दोघांनी पारंपरिक शेतील फाटा देत भाजीपाल पीक घ्यायला सुरुवात केली. पाऊण एकर शेतीत वर्षभर पारंपारिक पिकांसोबतच भाजीपाल्याचे नियोजन करून सोयाबीन, कापूस, यासोबतच मेथी, भेंडी, ऊस आदी पिके घेत त्यांनी आर्थिक बाजू भक्कम केली. पंकज झाडे याच्याकडे वडीलोपार्जित अडीच एकर शेती आहे. १५ वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. पंकजचे वडील नियमित भाजीपाल्याचीच शेती करायचे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत पंकजने तो गुण हस्तगत केला आहे. त्याला साथ दिली त्याचा मावसभाऊ श्रीकांतने. कारण पंकज जवळ शेती जेमतेम, पाण्याचा अभाव व सतत अडीच एकरात भाजीपाला बाराही माहिने घेतल्यामुळे जमीन आता सध्या भाजीपाल्यासाठी योग्य नाही. यामुळे श्रीकांतने मदतीचा हात देत पंकजच्या या उपक्रमात स्वत:ची शेती त्याला दिली. पावसाळ्यात सोयाबीनचे पीक घेतले. पाऊण एकरात अवघे तिनच पोते सोयाबीनचे उत्पन्न झाले. त्यानंतर त्याच जमिनीवर त्यांनी मेथीचे पीक घेतले. त्यातून ३० हजार रुपये खर्च वजा जाता नफा मिळाला होता. मेथीचे पीक दोन महिन्यात घेतल्यानंतर भेंडीचे उत्पादन घेण्यात आले. यातही नफा झाला. दोघांनी मिळून शेती केल्यामुळे पंकज उत्पादनाच नियोजन पाहतो तर श्रीकांत बाजारपेठेत ने-आण करण्याच्या खर्चाचे नियोजन करतो. (तालुका प्रतिनिधी)