शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तलावांना स्वच्छतेची प्रतीक्षा

By admin | Updated: January 24, 2015 22:59 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत गंगा नदीच्या स्वच्छतेची मोहीम भारत सरकारने हाती घेतली आहे़ नद्या स्वच्छ करून जलप्रदूषण दूर करण्याचे प्रयत्न होत असताना तलावांकडे मात्र दुर्लक्ष होत

वर्धा : स्वच्छ भारत अभियानांतर्गत गंगा नदीच्या स्वच्छतेची मोहीम भारत सरकारने हाती घेतली आहे़ नद्या स्वच्छ करून जलप्रदूषण दूर करण्याचे प्रयत्न होत असताना तलावांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसते़ जिल्ह्यातील अनेक तलाव प्रदूषित व उथळ झाले आहेत़ यामुळे दुर्लक्षित तलावांसाठीही स्वच्छता अभियान राबविणे गरजेचे झाले आहे़राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ आॅक्टोबरपासून देशभर स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे़ या अभियानांतर्गत शहरे, गावांसह नद्या स्वच्छ केल्या जात आहे़ कोट्यवधी रुपये खर्च करून गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी भारत सरकार सरसावले आहे; पण स्थानिक प्रशासन स्वच्छेकरिता विशेष काही करताना दिसत नाही़ पवनार ग्रामपंचायतीने धाम नदीच्या स्वच्छतेची मोहीम राबविली; तेथेही कार्यक्रमावर भर दिल्याचे दिसून आले़ प्रत्यक्षात नदीचे पात्र स्वच्छ झालेच नाही़ जिल्ह्यातील नद्या, नाले, तलाव प्रदूषित झाले आहेत़ हे प्रदूषण दूर करण्याकडे पाटबंधारे विभागासह स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा प्रशासनानेही दुर्लक्षच केल्याचे दिसते़ वर्धा शहर हद्दीत तलाव नसले तरी जिल्ह्यात नाचणगाव येथे दोन, गुंजखेडा ग्रा़पं़ हद्दीत एक, तळेगाव (टा़), मोझरी, मलकापूर यासह अन्य ग्रामीण भागात तलावांची संख्या मोठी आहे़ काही तलावांमध्ये घाण साचली आहे तर काही उथळ झाले आहेत़ या तलावातील घाण साफ करून गाळ काढणे गरजेचे झाले आहे; पण याकडे कुणाचेही लक्ष नाही़ यामुळे उन्हाळ्यात तलावात पाणी राहत नाही़नाचणगाव येथे दोन तलाव असून एक गावाच्या मध्यभागी आहे़ या पुरातन तलावाकडे दुर्लक्ष होत असल्याने घाण साचली आहे. मलकापूर येथील तलावाचे खोलीकरण झाले नाही़ गुंजखेडा तलावात पाणी असते; पण तो उथळ असल्याने लगतच्या शेतात पाणी शिरते़ शिवाय नाल्यातूनही पाणी वाहून जाते़ तळेगाव तलावाचीही खोली वाढविणे गरजेचे आहे़ (कार्यालय प्रतिनिधी)