शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

करवसुलीसाठी वडनेर ग्रामपंचायत लोकअदालतीत

By admin | Updated: December 11, 2014 23:10 IST

करवसुलीकरिता अकार्यक्षम ठरलेल्या वडनेर ग्रामपंचायतने दोन वर्ष पूर्वीपर्यंतच्या घर तसेच इतर थकीत करवसुलीसाठी लोक अदालतीत धाव घेतली आहे. यात हिंगणघाट तालुका विधी सेवा

पाच लाखांची थकबाकी: गावकऱ्यांना मिळाल्या नोटीस
वडनेर : करवसुलीकरिता अकार्यक्षम ठरलेल्या वडनेर ग्रामपंचायतने दोन वर्ष पूर्वीपर्यंतच्या घर तसेच इतर थकीत करवसुलीसाठी लोक अदालतीत धाव घेतली आहे. यात हिंगणघाट तालुका विधी सेवा समितीमार्फत गावाकऱ्यांना नोटीसी बजावण्यात आल्या आहेत. यामुळे गावात चांगलीच खळबळ माजली आहे.
हिंगणघाट तालुक्यातील वडनेर ग्रामपंचायत अंतर्गंत रहिवासी तसेच इतर कर अशी एकूण पाच लाख रुपये थकलेले आहे. थकीत करापोटी ग्रामपंचायतला भार असह्य झाल्याने ग्रापंचायतने एका ठरावांतर्गत करवसुलीकरिता लोक अदालतीत कर धारकांना खेचले आहे. सुमारे ३०० प्रकरणे तालुका विधी सेवा समितीकडे न्यायप्रविष्ठ करण्यात आली आहेत.
यामध्ये ग्रामपंचायतने दाखल केलेल्या प्रकरणामध्ये थकीत नसलेल्या तसेच केवळ वर्षाकाठी थकीत कर असलेल्या रहिवाशांना सुद्धा नोटीस पाठविण्यात आल्याने ग्रामपंचायतच्या कारभाराबाबत ग्रावकऱ्यांत असंतोष पसरला आहे. ग्रामपंचायतमध्ये कार्यरत ग्रामविकास अधिकारी यांनी लोक अदालतीत प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यापूर्वी कुठलीही शहानिशा न करता केवळ ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून आणि राजकीय सूड भावनेतून काही गावकऱ्यांना विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप गावकरी करीत आहेत.(वार्ताहर)