शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 05:00 IST

गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाजही व्यक्त केला आहे. खरिपाचे पिक हातचे गेल्यानंतर शेतकऱ्यांची रब्बी पिकांवर आशा असतानाच आता अवकाळीच संकट घोंगावत आहे. शेतशिवारात गहू व चण्याच्या मळणीला वेग आला असून बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. 

ठळक मुद्देशेतकऱ्यांची दाणादाण : बाजार समितीतील साडेतीन हजार क्विंटल शेतमाल भिजला

लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा (घा.) : अचानक वातावरणात बदल झाल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली असतानाच कारंजा तालुक्यात पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह जवळपास दीड ते दोन तास बरसलेल्या या पावसात बाजार समितीमधील व्यापाºयांचे साडेतीन हाजर क्विंटलपेक्षा अधिक धान्य ओले झाले. तसेच शेतशिवारातील पिकांचीही मोठ्या प्रमाणात नासडी नासाडी झाली असून शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे.गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाजही व्यक्त केला आहे. खरिपाचे पिक हातचे गेल्यानंतर शेतकऱ्यांची रब्बी पिकांवर आशा असतानाच आता अवकाळीच संकट घोंगावत आहे. शेतशिवारात गहू व चण्याच्या मळणीला वेग आला असून बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास कारंजा तालुक्यात अचानक वादळी पावसाने हजेरी लावली. तब्बल दोनतास धो-धो बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचीही दाणादाण झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील व्यापाऱ्यांचा जवळपास साडेतीन हजार क्विंटल शेतमाल ओला झाला. यामध्ये गहू, चणा, सोयाबीन आणि तूर आदी पिकांचा समावेश आहे.  

संत्रा बागांनाही बसला वादळाचा फटकाकारंजा तालुक्यात संत्र्याच्या बागाही मोठ्या प्रमाणात असून गुरुवारी पहाटे झालेल्या अवकाळी पावसाने संत्रा बागांनाही मोठा फटका बसला आहे. यासोबतच शेतात मळणीला आलेला किंवा मळणीकरिता कापून ठेवलेला गहू, चणा मातीमोल झाला. शेतात उभा असलेला गहूही जमिनीवर आडवा झाला आहे. त्यामुळे  उत्पादनातही मोठी घट होण्याची शक्यता आहे. 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार कारंजा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहील, अशी पूर्वसूचना दोन दिवसांपूर्वी दिली होती. तरीही काही शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीकरिता आणला होता. गुरुवारी पहाटे झालेल्या  अवकाळी पावसात ओला झालेला शेतमाल हा व्यापाºयांचा असून तो कालच खरेदी केलेला नसून चार ते पाच दिवसापूर्वीचा आहे.प्रशांत सोमकुवर, प्रभारी सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा

 

टॅग्स :Rainपाऊस