शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

काकानेच लावली जिनिंग मधील कापसाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 05:00 IST

कौस्तुभ उर्फ गौरव किशोर देशमुख रा. साईनगर आर्वी यांनी कर्ज घेवून २०१७ मध्ये देऊरवाडा मार्गावर के. डी. जिनिंग ॲण्ड प्रेसिंगची फॅक्टरी सुरू केली. घटनेच्या दिवशी जिनिंगच्या आवारात मोठ्या प्रमाणात कापूस होता. रविवारी सकाळी जिनिंगमध्ये संजय उपाध्ये, दीपक काळे, मयूर पवार, रामदास काळे हे हजर असताना एका हातात तलवार तर दुसऱ्या हातात पेट्रोल भरलेली शिशी घेवून दीपक देशमुख व त्याचा सहकारी नासरे हे तेथे आले.

ठळक मुद्देआरोपी अटक : ४६ लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : एका हातात तलवार तर दुसऱ्या हातात पेट्रोलची शिशी घेवून आर्वी येथील के.डी. जिनिंगमध्ये प्रवेश केलेल्या दीपक त्र्यंबक देशमुख याने चक्क पुतण्यावर प्राणघातक हल्ला करून जिनिंगच्या आवारातील कापूस जाळला. या प्रकरणी तक्रारीवरून आर्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. या आगीत जिनिंग मधील ४६ लाखांचा कापूस जळून कोळसा झाला. आगीची माहिती मिळताच आर्वी न.प. च्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.कौस्तुभ उर्फ गौरव किशोर देशमुख रा. साईनगर आर्वी यांनी कर्ज घेवून २०१७ मध्ये देऊरवाडा मार्गावर के. डी. जिनिंग ॲण्ड प्रेसिंगची फॅक्टरी सुरू केली. घटनेच्या दिवशी जिनिंगच्या आवारात मोठ्या प्रमाणात कापूस होता. रविवारी सकाळी जिनिंगमध्ये संजय उपाध्ये, दीपक काळे, मयूर पवार, रामदास काळे हे हजर असताना एका हातात तलवार तर दुसऱ्या हातात पेट्रोल भरलेली शिशी घेवून दीपक देशमुख व त्याचा सहकारी नासरे हे तेथे आले. आरोपी दीपक देशमुख इतक्यावरच थांबला नाही तर त्यांने टेबलवर तलवार आपटत तुझा बाप माझी बदनामी करत आहे, असे म्हणत जिनिंगमधील कापसाला आगीच्या हवाली केले. शिवाय घटनास्थळावरून पळ काढला. दीपक देशमुख याने पळ काढताना गौरव याचा मोबाईल हिस्कावून तो आगीत फेकला. त्यानंतर आगीची माहिती अग्निशमन विभागाला देत पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच आर्वीचे ठाणेदार संजय गायकवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. या प्रकरणी गौरव देशमुख यांच्या तक्रारीवरून गौरवचे काका दीपक देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास आर्वी पोलीस करीत आहेत.

पेट्रोल मिळाले कसे?शिशीमध्ये पेट्रोल किंवा डिझेल देण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. परंतु, या प्रकरणातील आरोपीने एका हातात तलवार तर दुसऱ्या हातात पेट्रोल भरलेली शिशी घेवून जिनिंगच्या आवारात प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे.

 

टॅग्स :fireआग