शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'शक्तिपीठ'ची मोजणी पूर्ण आता भूसंपादनाची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 11:49 IST

पवनार ते पत्रादेवी : महामार्गाची लांबी ८४० किलोमीटरपर्यंत वाढली

वर्धा : पवनार ते पत्रादेवी या शक्तिपीठ महामार्गाच्या सांगलीपर्यंतच्या आखणीस आणि भूसंपादनासाठी राज्य सरकारने पाच महिन्यांपूर्वी ऑगस्टमध्ये मान्यता दिली होती. त्यानुसार जवळपास १५० पेक्षा जास्त गावांतील जमीनमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली. आता जमीन संपादनाची प्रतीक्षा लागली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड आणि आजरा तालुक्यातील शक्तिपीठ महामार्गाची आखणीची अधिसूचना रद्द केली होती. पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटी आणि त्यावरील संभाव्य व्याज ८ हजार ७८७ कोटी, असे एकूण २० हजार ७८७ कोटी रुपयांनाही मंजुरी मिळाली होती. प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यातील मार्गाच्या आखणीचे कामही 'एमएसआरडीसी'कडून पूर्ण झाले आहे.

मार्गात थोडा बदल झाला 

हा मार्ग १२ जिल्ह्यांतून जाणार  आहे. त्याची लांबी ८०२ किलोमीटर असणार आहे. मात्र, आता या मार्गात सातारा जिल्ह्यातील काही भाग समाविष्ट करण्यात आला आहे. दुसरीकडे, कोल्हापूरमधील चंदगड तालुक्यातून हा मार्ग वळवण्यात आला आहे. महामार्गाची लांबी ८४० किलोमीटर होण्याची शक्यता आहे.

३७० गावांमधून जाणार

शक्तिपीठ महामार्ग, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील ३९ तालुके, ३७० गावांतून जाणार आहे. या मार्गाला १८ धार्मिक स्थळे जोडली जाणार आहे. एमएसआरडीसीने वर्धा ते सांगलीदरम्यानच्या १५० गावांतील जमिनीची मोजणी पूर्ण केल्याचे सांगण्यात आले. उर्वरित गावांची मोजणी पूर्ण होताच भूसंपादन सुरू होईल.

तीन शक्तिपीठे जोडणार

माहूर, तुळजापूर आणि कोल्हापूर, ही राज्यातील तीन शक्तिपीठे या मार्गाने जोडली जाणार आहे. याशिवाय परळी वैजनाथ, औंढा नागनाथ, पंढरपूर, नरसोबाची वाडी अशी काही धार्मिक स्थळे या महामार्गाने जोडली जातील.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Shaktipeeth Highway Land Measurement Complete, Land Acquisition Awaited

Web Summary : Land measurement for the Shaktipeeth highway from Wardha to Sangli is complete. Covering 150+ villages, land acquisition awaits. The 840 km route connects 18 religious sites across 12 districts, including three Shaktipeeths: Mahur, Tuljapur, and Kolhapur.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र