शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बियाणं पेरलं; पण उगवलंच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST

सोयाबीनची पेरणी मृग नक्षत्राच्या १४ तारखेपर्यंत झाली. त्यानंतर तालुक्यात १५ व १६ ला पाऊस आला; पण काही कंपन्यांचे बियाणे बोगस ठरले. ज्यांच्या शेतात पेरणी झाली; पण बियाणेच उगवले नाही अशा शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली.

ठळक मुद्देसेलू तालुक्यातील २७ शेतकऱ्यांनी नोंदविली तक्रार : कृषी विभागाच्या पथकाने भेट देत केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : मृग नक्षत्रात पेरणीयोग्य झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली; मात्र काही शेतकऱ्यांच्या शेतात बीज अंकुरलेच नसल्याने खरेदी केलेल्या बियाण्यांवर प्रश्न निर्माण झाला आहे. तक्रारीनंतर कृषी विभागाच्या चमूने २७ शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देत पंचनामा केला. यात विविध कंपन्यांच्या बियाण्यांचा समावेश आहे.सोयाबीनची पेरणी मृग नक्षत्राच्या १४ तारखेपर्यंत झाली. त्यानंतर तालुक्यात १५ व १६ ला पाऊस आला; पण काही कंपन्यांचे बियाणे बोगस ठरले. ज्यांच्या शेतात पेरणी झाली; पण बियाणेच उगवले नाही अशा शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली.त्यातील काही शेतकऱ्यांनी कंपन्यांशी जुळवूून घेत बियाणे घेऊन समाधान मानले, तर काहींनी तक्रारी केल्या. त्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथील शास्त्रज्ञ उंबरकर, तालुका कृषी अधिकारी राधिका बैरागी, मंडळ कृषी अधिकारी ढेंधरे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी मुरारकर, चव्हाण, पर्यवेक्षक दांडेकर, सहाय्यक पांडे आदींनी कृषी विभागाच्या पथकाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यात आकोली येथील विशाल गोमासे, तर घोराड येथील काही शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांना न्याय मिळणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.कंपन्यांकडून शेतकऱ्यांची बोळवणसोयाबीन बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पुन्हा मोफत बियाणे पुरवून शेतकºयांची बोळवण करण्याचा प्रकार सुरू आहे मात्र, बियाणे प्रमाणित करणारी टीम याकडे दुर्लक्ष करीत आहे. शासनाने दखल घेणे गरजेचे आहे.शेतकऱ्यांच्या प्राप्त तक्रारीनुसार आम्ही व पथकाने शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. तसा अहवाल तयार केला. हा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे.- राधिका बैरागी, तालुका कृषी अधिकारी, सेलू.बोगस बियाण्यांमुळे आर्थिक फटकाआंजी (मोठी) : पवनूर येथील गजानन नामदेव कडू यांनी १० बॅग महाबीज कंपनीचे बियाणे खरेदी करून पेरणी केली. मात्र, बराच काळ लोटूनही बियाणे न उगवलेच नाही. यासंदर्भात कडू यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली आहे. नुकसानभरपाई देण्यासह बियाणे पास करणाºयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी