शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी पडली २३४ नवीन कोविड बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 05:00 IST

जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल २३४ नवीन कोविड बाधित सापडल्याने आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. नवीन कोविड बाधितांमध्ये पहिल्या फळीतील काही कोविड योद्धांचा समावेश असून दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातील विविध विभागात काम करणाऱ्या कार्यरत अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. शनिवारी जिल्ह्यात २३४ नवीन कोविड बाधित आढळले असून त्यात १३८ पुरुष तर ९६ महिलांचा समावेश आहे.

ठळक मुद्देनव्या रुग्णांत १३८ पुरूष तर ९६ महिलांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील काही दिवसांपासून वर्धा जिल्ह्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढली आहे. शनिवारी जिल्ह्यात तब्बल २३४ नवीन कोविड बाधित सापडल्याने जिल्ह्याची कोविड बाधितांची संख्या आता १४ हजार ६२३ झाली आहे. कोविड-१९ हा विषाणू जिल्ह्यात दिवसेंदिवस आपला व्याप्ती वाढवित असल्याने प्रत्येक नागरिकाने दक्ष राहण्याची गरज आहे.जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल २३४ नवीन कोविड बाधित सापडल्याने आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. नवीन कोविड बाधितांमध्ये पहिल्या फळीतील काही कोविड योद्धांचा समावेश असून दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातील विविध विभागात काम करणाऱ्या कार्यरत अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. शनिवारी जिल्ह्यात २३४ नवीन कोविड बाधित आढळले असून त्यात १३८ पुरुष तर ९६ महिलांचा समावेश आहे. या नवीन कोविड बाधितांपैकी लक्षणविरहित तसेच कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या कोविड बाधितांना स्वयंघोषणापत्र भरून दिल्यावर गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर गंभीर कोरोना बाधितांना कोविड रुग्णालयात हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात सध्या १ हजार २१५ ॲक्टिव्ह कोविड बाधित असून यापैकी बहूतांश ॲक्टिव्ह कोविड बाधित सध्या गृहअलगीकरणात आहेत. तर गंभीर रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

दोन महिलांसह पाच पुरुषांचा घेतला कोविडने बळीशनिवारी जिल्ह्यात तब्बल २३४ नवीन कोविड बाधितांची भर पडली असून एकाच दिवशी दोन महिलांसह पाच पुरुषांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. मृतकांमध्ये वर्धा तालुक्यातील ८१ वर्षीय पुरुष, ३८ व ७२ वर्षीय महिला, आर्वी तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुष, देवळी तालुक्यातील ५७ व २८ वर्षीय पुरुष तर कारंजा तालुक्यातील ७९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३८४ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या १ हजार २१५ ॲक्टिव्ह कोविड बाधित आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या