शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

कालव्याच्या पाण्यात हरविला पांदण रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 06:00 IST

कालव्याच्या अपुऱ्या कामामुळे पढेगावसह परिसरात कॅनलच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. शिवाय सदर पाणी शेतात शिरत असल्याने उभ्या पिकांवर त्याचा वितरित परिणाम होत आहे. पढेगाव येथील मौजा अफजलपूर शिवारात निम्न वर्धा धरणाचे पाणी कालव्याद्वारे सोडण्यात आले. परंतु, कालव्याच्या अपूर्ण कामामुळे सोडण्यात आलेले पाणी याच भागातील पांदण रस्त्याने वाहते.

ठळक मुद्देपढेगाव येथील प्रकार : २५ शेतकऱ्यांच्या अडचणीत भर

विनोद घोडे।लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : नादुरूस्त वितरीकांचा परिसरातील शेतकऱ्यांचा चांगलाच फटका सध्या सहन करावा लागत आहे. अशातच नादुरूस्त वितरीकेमुळे कॅनलचे पाणी थेट पांदण रस्त्याने वाहत असल्याने पढेगाव येथील २५ शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. पाटंधारे विभागाने तातडीने योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.कालव्याच्या अपुऱ्या कामामुळे पढेगावसह परिसरात कॅनलच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. शिवाय सदर पाणी शेतात शिरत असल्याने उभ्या पिकांवर त्याचा वितरित परिणाम होत आहे. पढेगाव येथील मौजा अफजलपूर शिवारात निम्न वर्धा धरणाचे पाणी कालव्याद्वारे सोडण्यात आले. परंतु, कालव्याच्या अपूर्ण कामामुळे सोडण्यात आलेले पाणी याच भागातील पांदण रस्त्याने वाहते. शिवाय अनेक शेतकऱ्यांच्या शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. पांदण रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने त्याच भागातील २५ शेतकऱ्यांना हिवाळ्याच्या दिवसात चिखल तुडवतच शेतात जावे लागत आहे. सध्या रबी हंगामाची तयारी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. विविध कामे झटपट कशी पूर्ण होईल यावर शेतकरीही लक्ष केंद्रीत करून आहे. परंतु, शेतात जाण्यासाठी असलेल्या मार्गावर कॅनलच्या पाण्यामुळे चिखल तयार झाल्याने शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरतच करावी लागत आहे. सध्या कपाशी उत्पादक शेतकऱ्यांकडून कापूस वेचणीला गती दिली जात आहे. परंतु, पांढरे सोन अशी ओळख असला कापूस घरी कसा न्यावा असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. या पांदण रस्त्याने साधे पायी जाणेही कठीण असून शेतात बैलगाडी नेण्याची हिम्मतही शेतकºयांची होत नाही. पांदण रस्त्याला तळ्याचे स्वरूप आल्याने शेतकरी धनराज साटोणे, प्रशांत दुर्गे, किशोर तडस, महादेव भट, गजानन दुर्गे, गंगाधर कानेटकर, राजेंद्र दुर्गे, ज्ञानेश्वर गुजरकर, विठ्ठल गुजरकर, सुरेश शेंडे, रामभाऊ शेंडे, किसना कुडमते, विजय अंतुरकर, गोकुल पचारे, गौरव शेंडे, अनिल चोरे यांच्यासह आदी शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक