शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
2
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
3
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
4
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
5
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
6
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
7
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
8
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
9
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
11
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
12
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
13
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
14
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
15
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
16
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
17
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
18
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
19
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
20
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
Daily Top 2Weekly Top 5

बोरधरणाच्या पाण्याने रस्ता, शेती जलमय

By admin | Updated: December 9, 2014 22:55 IST

गत ४० दिवसांपासून ओलितासाठी वितरिकांत पाणी सोडण्यात आले आहे; पण साफसफाई करण्यात आली नाही़ यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असून शेतकऱ्यांच्या शेतातही पाणी शिरत आहे़

घोराड/बोरधरण : गत ४० दिवसांपासून ओलितासाठी वितरिकांत पाणी सोडण्यात आले आहे; पण साफसफाई करण्यात आली नाही़ यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असून शेतकऱ्यांच्या शेतातही पाणी शिरत आहे़ शिवाय परिसरातील रस्तेही जलमय झाले आहे़ संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने रस्ते, शेतांचे नुकसान होत असून पाण्याचा अपव्यय होत आहे़ याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़
घोराड ते कोलगाव हा डांबरी रस्ता आहे़ या रस्ता व गावालगत वितरिका आहे़ गत काही वर्षांपासून बोर प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी या वितरिकेच्या साफसफाईकडे दुर्लक्ष केले आहे. वितरिकेवरून पाणी वाहत असल्याने ते लगतच्या शेतात शिरले आहे. शेताला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून शेतातून वाहणारे पाणी गत काही दिवसांपासून रस्त्यावर दिसून येत आहे़ यात हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. पाण्याचा अपव्यय होतो, त्या स्थळापासून अर्धा किमी अंतरावर बोर प्रकल्प पाटबंधारे विभागाचे कार्यालय आहे. ही वितरिका पूर्णत: पाझरत असून वितरिकेला लागूनच असलेल्या घराशेजारी पाणी साचत आहे. याबाबतची तक्रार पंचायत समिती सदस्य रजनी तेलरांधे यांनी अधिकाऱ्यांना स्वत: भेटून केली; पण वितरिकेची दुरूस्ती करण्यात आली नाही. पाणी हे जीवन आहे. पाण्याचा अपव्यय पाहवला जात नाही. यामुळे बोरधरणातील पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी वितरिकेची दुरूस्ती व साफसफाई करावी, अशी मागणी घोराड ग्रा़पं़ चे उपसरपंच अमीत तेलरांधे यांनी पाटबंधारे विभागाला केली आहे.
नुकत्याच झालेल्या पं़स़ च्या आमसभेत तालुक्यातील बोर, पंचधारा, मदन उन्नई आदी प्रकल्पांच्या वितरिकेच्या साफसफाईचा मुद्दा गाजला. यात संबंधित अधिकाऱ्यांनी दुरूस्तीसाठी निधीच नसल्याने कामे कशी करावी, असा प्रश्न उपस्थित केला होता़ यामुळे पाण्याचा अपव्यय पाटबंधारे विभाग कसा थांबविणार, हा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे़ पाटबंधारे विभागासह जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांद्वारे करण्यात येत आहे़(वार्ताहर)