शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त प्राध्यापकाने स्मशानामध्येच फुलविली शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:00 IST

संजय अंबादास वानखडे असे सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे. आर्वीतील संजयनगरनजीक बोहरा समाजाची सात एकर जागा आहे. त्यातील दीड एकर जागेत स्मशानभूमी असून, उर्वरित जागा पडीक होती. या सातही एकराच्या परिसराला आमदार निधीतून ताराचे कुंपण करण्यात आले. पडीक जागा उपयोगी लागावी, यासाठी संजय वानखेडे यांनी बोहरा समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. 

ठळक मुद्देपाच एकरांत घेतात उत्पादन : स्मशानभूमीतच केली राहुटी

राजेश सोळंकीलोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : जेथे मृतात्म्याला अखेरचा निरोप दिला जातो, त्या भूमीवर दिवसरात्र राहायचे म्हटले, तर अंगावर काटा उभा होतो. मात्र, येथील सेवानिवृत्त प्राध्यापकाने शेतीकरिता स्मशानभूमीची जागा निवडून व तेथेच निवास करून तेथे सेंद्रिय शेती फुलविली आहे. त्यांचा हा अनोखा प्रयोग चर्चेचा विषय व अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.संजय अंबादास वानखडे असे सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे. आर्वीतील संजयनगरनजीक बोहरा समाजाची सात एकर जागा आहे. त्यातील दीड एकर जागेत स्मशानभूमी असून, उर्वरित जागा पडीक होती. या सातही एकराच्या परिसराला आमदार निधीतून ताराचे कुंपण करण्यात आले. पडीक जागा उपयोगी लागावी, यासाठी संजय वानखेडे यांनी बोहरा समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. या जागेवर शेतीसोबतच पिकनिक स्पॉट, लहान मुलांसाठी खेळणी, बगीचा व फुलझाडे लावण्याची संकल्पना त्यांनी मांडली. बोहरा समाजाच्या प्रतिनिधींना ही संकल्पना पटल्याने वानखेडे यांनी ५५ हजार रुपयांमध्ये पाच एकर शेती ठेक्याने घेतली. त्यांनी ठरल्याप्रमाणे ही शेती विकसित केली. यामुळे आता येथे सर्वत्र हिरवळ पसरली आहे. हा ओसाड परिसर पिकनिक स्पॉटच झाला आहे. बोहरा समाजातील कुटुंबीय या परिसरात येऊन निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होतात. इतरही नागरिक विरंगुळा म्हणून या ठिकाणी वेळ घालवतात. सेवानिवृत्त प्राध्यापकाची आता स्मशानात राहणारा मनुष्य म्हणून शहरात ओळख निर्माण झाली आहे. 

ओसाड परिसरात बहरले हिरवागार माळरानपाण्याची अडचण असल्याने वानखेडे यांनी स्मशानभूमीतील विहिरीत सर्वप्रथम आडवे बोर केले. त्यानंतर संरक्षण भिंतीलगत लावण्यासाठी १८ हजार रुपयांची शोभेची झाडे आणली. चार लाख रुपये खर्च करून पाचही एकरांत ठिंबक सिंचनाची सोय केली. जमीन कसण्यायोग्य केल्यानंतर शेणखत, गोमुत्राचा वापर करून सेंद्रिय शेतीच केली. भुईमूग, मका, तूर व चण्याचे पीक त्यांनी घेतले. आता दोन  एकरात पपईची लागवड केली, तर उर्वरित जागेवर अद्रक, वांगी व कलिंगड लावले आहे. त्यामुळे हा परिसर आता अनेकांना खुणावत आहे.

३३ वर्षे प्राध्यापक म्हणून नोकरी केल्यानंतर आता सेवानिवृत्त झालो. शेती हा माझा पिढीजात व्यवसाय. स्मशानातील शेतीतून नफा कमाविणे हा माझा उद्देश नाहीच. येथे येणाऱ्या दु:खी माणसांचे  मन प्रसन्न व्हावे, मृतात्म्यालाही खऱ्या अर्थाने मोक्षधामाची प्रचिती व्हावी, हा प्रामाणिक प्रयत्न आहे. शेतीबरोबर एक ते दीड एकरात लहान मुलांसाठी बगीचा, खेळणे, झुला आदी विविध साहित्य लावायचे असून, येथे गार्डन डेव्हलपमेंट फार्म तयार करण्याचा मानस आहे, जेणेकरुन मुले, कुटुंब पिकनिकचा आनंद घेतील आणि स्मशानाबद्दल अंधश्रद्धा दूर होण्यास मदत होईल.- संजय अंबादास वानखडे,           सेवानिवृत्त प्राध्यापक.

 

टॅग्स :agricultureशेती