पोलीस दादांनी दिले ७२ भुकेल्यांना जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 06:00 AM2020-03-26T06:00:00+5:302020-03-26T06:00:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : बसस्थानक, रेल्वे स्थानक या सार्वजनिक ठिकाणी बेवारस स्थितीत थांबलेल्या भुकेल्या ७२ व्यक्तींना जेवन देण्यात ...

Police provided meals to 72 hungry | पोलीस दादांनी दिले ७२ भुकेल्यांना जेवण

पोलीस दादांनी दिले ७२ भुकेल्यांना जेवण

Next
ठळक मुद्दे‘खाकी’ने जोपासली सामाजिक बांधिलकी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बसस्थानक, रेल्वे स्थानक या सार्वजनिक ठिकाणी बेवारस स्थितीत थांबलेल्या भुकेल्या ७२ व्यक्तींना जेवन देण्यात आले. हा उपक्रम वर्धा शहर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत राबविला.
मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील २१ दिवसांसाठी संपूर्ण देशात लॉक डाऊनची घोषणा केली आहे. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असून जो ज्या ठिकाणी आहे त्याने त्याच ठिकाणी पुढील २१ दिवस थांबावे. तसेच नागरिकांनी या २१ दिवसांच्या कालावधीत घरातच राहून कोरोनाशी लढा देणाऱ्या यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक ठिकाणी आसरा घेतलेल्या भुकेलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना जेवन देण्यात आले.
हा उपक्रम पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश पारधी यांच्या नेतृत्त्वात शहर पोलीस ठाण्यातील सचिन धुर्वे, सचिन इंगोले, पवन नीलेकर, महादेव सानप, सुर्यवंशी, दिवाकर परिमल, विकास मुंडे, सचिन राठोड यांच्यासह अधिकाºयांनी व कर्मचाºयांनी राबविला. लॉक डाऊन दरम्यान या व्यक्तींना दोनवेळचे जेवन देण्याची जबाबदारी शहर पोलिसांनी उचलली असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: Police provided meals to 72 hungry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.