शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
2
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
3
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
4
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
5
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
6
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
7
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
8
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
9
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
10
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
11
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
12
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
13
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
14
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
15
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
16
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
17
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
18
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
19
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
20
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
Daily Top 2Weekly Top 5

शहर ठाण्यातील ‘त्या’ पोलीस कर्मचाऱ्याचे गुन्हेगारी जगताशी ‘कनेक्शन ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 05:00 IST

 शहरातील ‘भाईं’शी त्याने जवळीक साधली. त्यानंतर पोलीस खात्यात राहून तो दारूविक्रेत्यांकडून पैसे उकळण्याचे कामही करीत होता, ही बाब आता पुढे आली आहे. याविषयी वरिष्ठांपर्यंत अनेक तक्रारी गेल्या होत्या. पोलीस खात्यात राहूनही तो गुन्हेगारी प्रवृत्तीचाच असल्याने त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांनी  लावून धरली आहे. पोलीस कर्मचारी सचिन दीक्षित याने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मॉर्निंग वॉकला गेलेले शारीरिक  शिक्षक रौनक सबाने यांना मागाहून जबर धडक दिली होती.

ठळक मुद्देदारूविक्रेत्यांकडून उकळत होता पैसे : वरिष्ठांकडे दाखल होत्या अनेक तक्रारी, कारवाईकडे लागले आता सर्वसामान्यांचे लक्ष

लाेकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पहाटे पाेलीस कर्मचारी सचिन दीक्षित याने मद्यधुंद अवस्थेत चारचाकी चालवून मॉर्निंग वॉकला गेलेल्या रौनक सबाने यांना उडविले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सचिन दीक्षित पोलीस खात्यात येताच अल्पावधीत त्याचे गुन्हेगारी जगताशी कनेक्शन झाले.     शहरातील ‘भाईं’शी त्याने जवळीक साधली. त्यानंतर पोलीस खात्यात राहून तो दारूविक्रेत्यांकडून पैसे उकळण्याचे कामही करीत होता, ही बाब आता पुढे आली आहे. याविषयी वरिष्ठांपर्यंत अनेक तक्रारी गेल्या होत्या. पोलीस खात्यात राहूनही तो गुन्हेगारी प्रवृत्तीचाच असल्याने त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांनी  लावून धरली आहे. पोलीस कर्मचारी सचिन दीक्षित याने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मॉर्निंग वॉकला गेलेले शारीरिक  शिक्षक रौनक सबाने यांना मागाहून जबर धडक दिली होती. यात त्यांचा निष्पाप बळी गेला. सचिन दीक्षित पोलीस खात्यात आल्यानंतर त्याने गुन्हेगारांशी जवळीक निर्माण केली. काही गुन्हेगारांना त्याने मदतही केली. खबऱ्या म्हणूनच त्याने जबाबदारी निभावली.     यामुळे पोलीस खात्यात त्याची कारकीर्द वादग्रस्त अशीच राहिली. कर्मचारी असूनही त्याचा गुन्हेगारांमध्ये अधिकाऱ्याएवढाच रुबाब होता. दारूविक्रेत्यांशी उठबस, त्यांच्याकडून पैसे उकळणे, पोलीस ठाण्याबाहेरच मांडवली करणे, गुन्हेगारांना मदत करणे आदी अनेक कारनामे  आता पुढे येत आहेत.  पोलीस असल्याचा फायदा घेत अनेकांना धमकाविण्याचे कामही त्याने केले.      शहरातील ‘भाई’ म्हणून घेणाऱ्यांशी त्याची ओळख झाली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त तो ‘गिफ्ट’ घेऊन जायचा. एका साध्या पोलीस कर्मचाऱ्याचे गुन्हेगारांशी कनेक्श्न हे म्हणजे ‘घर का भेदी लंका ढाय’ असेच म्हणावे लागेल. अशा पोलीस कर्मचाऱ्यामुळे संपूर्ण पोलीस विभागाची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे सचिन दीक्षितवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.  

अपघाताच्या पहाटे काय घडले?२९ डिसेंबरला सचिन दीक्षित याचा वाढदिवस होता. पार्टी करण्यासाठी तो ३१ च्या रात्री काही गुन्हेगारी विश्वातील युवकांसोबत बाहेरगावी गेला. तेथे मनसोक्त दारू ढोसली आणि मध्यरात्री तो इतवारा परिसरात गेला. तेथे एका दारूविक्रेत्याची कार त्याने मागून सिगारेट पिण्यास रेल्वेस्थानकावर गेला. तेथून तो बॅचलर रोडने गेला आणि दारूची झिंग असल्याने पुढे त्याने अपघात केला. अपघाताचे सर्व चित्रण सीसीटीव्हीत कैद झाले असून जाणिवपूर्वक त्याने रौनक सबानेला उडविल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे त्याच्यासोबत असलेल्यांचेही बयाण नोंदवून कारवाई करण्याची मागणी होत आहे.  

टॅग्स :PoliceपोलिसAccidentअपघात