शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

शहीद स्मारकाची उपेक्षा

By admin | Updated: August 9, 2015 02:07 IST

१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात १४ आॅगस्ट रोजी जुलमी इंग्रजी प्रशासनाने केलेल्या गोळीबारात शहीद झालेल्या केशव बळीराम बोंगीरवार..

खरांगणा : १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात १४ आॅगस्ट रोजी जुलमी इंग्रजी प्रशासनाने केलेल्या गोळीबारात शहीद झालेल्या केशव बळीराम बोंगीरवार यांच्या स्मृती तेवत राहाव्या व जनतेला स्वातंत्र्य आंदोलनाची धग कायमस्वरूपी जाणवत राहावी या उद्देशाने बॅरीस्टर अंतुले मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातील शहिदांच्या नावे स्मारके उभी करण्यात आली. यापैकी एक म्हणजे मोरांगणा येथील शहीद स्मारक होय; पण सध्या या स्मारकाची उपेक्षा होत असल्याचे दिसते.या स्मारकाची सध्याची स्थिती अत्यंत दुर्दैवी आहे. सिलींग, फरशी, प्लास्टर जागोजागी उखडले आहे. कुंपण भिंत, गेट पालथे झाले आहे. खांब वाकले आहे. छतावरील सिमेंटच्या शिटा फुटलेल्या आहेत. इलेक्ट्रीक फिटींग लायटींग अस्तित्वातच राहिली नाही, अशी केवीलवानी अवस्था स्मारकाची झाली आहे. स्मारकाचे बांधकाम झाल्यानंतर शासनाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देखभालीकरिता इतर स्मारकांप्रमाणे जिल्हा परिषदेकडे पर्यायाने पंचायत समितीला हस्तांतरित केले. ग्रामपंचायतीकडून देखभाल दुरूस्ती सुरू झाली; पण वार्षिक २४०० रुपयांची तुटपुंजी तरतूद शासनाने केल्याने वीज बील, रंगरंगोटी, तुटफुट दुरूस्ती ही कामे ग्रा.पं. करणे शक्य होत नव्हते. शासनाकडे मागणी करूनही निधी देण्यात आला नाही. १५ वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार डॉ. शरद काळे यांच्याकडे कैफियत मांडली असता त्यांनी आपल्या निधीतून दुरूस्ती काम करून घेतले; पण काही वर्षांतच हे स्मारक जीर्ण झाले. महाराष्ट्रातील बहुतेक स्मारकांची ही अवस्था पाहता शासनाने स्मारके नोंदणीकृत सेवाभावी संस्थांना देखभालीकरिता करारपत्रावर दिली. त्यांना किमान १५ हजार रुपये खर्च करण्यासाठी बिज भांडवल म्हणून दिले. त्या अनुषंगाने येथील स्मारकही एका संस्थेस देखभाल दुरूस्तीसाठी दिले. संस्थेने स्मारकाची दुरूस्तीही केली; पण पुन्हा परिस्थिती जैसे थे दिसून येते. स्मारकाची दुरवस्था पाहता ग्रा.पं. ने ताब्यात देण्याची पुन्हा शासनाकडे मागणी केली. स्मारक स्वातंत्र्य आंदोलनाचे प्रेरणास्थान म्हणून विकसित करायचे झाल्यास आठ ते दहा लाखांचा खर्च होणे अपेक्षित आहे; पण शासन व लोकप्रतिनिधी दोघांनाही देशासाठी हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्य सेनानींप्रती वास्तूच्या स्वरूपात आदरांजली अर्पण कराविशी वाटत नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.