कोरोनाची धास्ती;भक्तांनी फिरवली मंदिराकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 06:00 AM2020-03-27T06:00:00+5:302020-03-27T06:00:12+5:30

जगभर कोरोनाची धास्ती आहे. गर्दी टाळण्यासाठी संचारबंदी लागू केल्याने अनेक नागरिक घरीच देवपूजा करुन कोरोना आजाराचे संकट टळू दे अशी प्रार्थणा नागरीक करीत आहे. ज्या मारोतीच्या मंदिरावर शनिवारी गर्दी व्हायची, आता त्याही संकटमोचनाच्या मंदिरावर कुणीच दिसत नाही. गावातील अनेक नागरिक मंदीराच्या पारावर गप्पा गोष्टी करायचे, तो मंदीराचा पार ही शांत झाला आहे.

Horror of Corona; Devotees turn to temple | कोरोनाची धास्ती;भक्तांनी फिरवली मंदिराकडे पाठ

कोरोनाची धास्ती;भक्तांनी फिरवली मंदिराकडे पाठ

Next
ठळक मुद्देअनेक मंदिर कुलूपबंद : मंदिर परिसरातील दुकानदारावरही बेरोजगारीचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्क
विरूळ (आकाजी) : रोज ज्या मंदीरात पूजा व्हायची, देवाळतल्या मूर्तींची आंघोळ व्हायची, ज्या मंदीरातील रोज घंटानाद होऊन आरती केली जायची, ती मंदिरे गेल्या आठवड्यापासून ओस पडलेली आहे. एकही भाविक या मंदिराकडे फिरकत नसून मंदिरेही कुलूपबंद करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूच्या धास्तीने परिसरातील ग्रामीण भागातीलही अनेक मंदिर कुलूप बंद आहे. मंदिर कुलूपबंद असल्यामुळे भक्तमंडळी मंदीराकडे जातांना दिसत नाही. सध्या हे भयानक वास्तव अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. इतका शुकशुकाट व मंदिर बंद करण्याची वेळ परिसरातील नागरिकांनी कधीही अनुभवली नाही, असे वृद्ध मंडळी सांगत आहे. संकटाच्या वेळी देवाचे नाव घेणारे व मंदीराचा दरवाजा ठोठावणारे आपण पाहिले. परंतु कोरोना आजाराच्या धास्तीने मंदिर बंद पडल्याने देवळातील मूर्ती सुध्दा ऐकटी पडली आहे.
जगभर कोरोनाची धास्ती आहे. गर्दी टाळण्यासाठी संचारबंदी लागू केल्याने अनेक नागरिक घरीच देवपूजा करुन कोरोना आजाराचे संकट टळू दे अशी प्रार्थणा नागरीक करीत आहे. ज्या मारोतीच्या मंदिरावर शनिवारी गर्दी व्हायची, आता त्याही संकटमोचनाच्या मंदिरावर कुणीच दिसत नाही. गावातील अनेक नागरिक मंदीराच्या पारावर गप्पा गोष्टी करायचे, तो मंदीराचा पार ही शांत झाला आहे. कधी नव्हे ऐवढ्या भीषण परिस्थितीला नागरिक समोर जातांना दिसत आहे.
कोरोना आजाराच्या धास्तीने अनेकांचे रोजगार हिरावला आहे. कंपन्या, शेतीचे कामे, दुकान बंद पडल्याने रोजगार बंद पडला आहे. अनेक गरिबांच्या घरची परिस्थिती हातावर आणने व पानावर खाण्यासारखी आहे. सर्वच कामे बंद पडल्याने व रोजगार नसल्याने अनेकांचे दोन वेळचे जेवणाचे वांदे झाले आहे. या परीसरात समृध्दी महामार्गाच्या कामासाठी अनेक परप्रांतीय मजूर या परिसरात दाखल झाले आहे. अनेक कुटूंब वास्तव्यास आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या अ‍ॅफकॉन कंपनीने काम बंद केल्याने अनेक परप्रांतीय मजूर बेरोजगार झाले आहे. त्यांच्या हाताला काम नाही कंपनीने कामाच्या दिलेल्या पैशात त्याचा संसार चालविला जात आहे. हातातील पैसा संपल्यावर काय करायचे, काय खायचे, लेकराबाळांचे पोट कसे भरायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हे मजूर विरुळ व रसुलाबाद गावात येऊन काम मागत आहे. कामेच नसल्याने व सर्व व्यवहार ठप्प झाल्याने त्यांना काम तरी कसे द्यायचे ही समस्या आहे. म्हणून त्यांची या संचारबंदीच्या काळातही मजुरीकरिता भटकंती सुरु असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Horror of Corona; Devotees turn to temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.