शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बहुरुपी समाजाला मिळणार घरकूल

By admin | Updated: December 10, 2014 23:03 IST

विदर्भात बहुसंख्येने असलेल्या बहुरूपी समाज आजही सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित आहे. जातीचे प्रमाणपत्र न मिळाल्याने शैक्षणिक व सेवाक्षेत्रात आरक्षणाचा लाभ मिळत नसे.

वर्धा : विदर्भात बहुसंख्येने असलेल्या बहुरूपी समाज आजही सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित आहे. जातीचे प्रमाणपत्र न मिळाल्याने शैक्षणिक व सेवाक्षेत्रात आरक्षणाचा लाभ मिळत नसे. यामुळे सामाजिक विकासात माघारलेल्या या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरिता राज्य शासनाने बहुरूपी समाज बांधवांना घरकूल व जातीचे प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली आहे.
यासंदर्भात नागपूर येथे घेण्यात आलेल्या बैठकीत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांनी माहिती दिली. वर्धा विधानसभा मतदार संघातील केळझर, जंगलापूर, सेलू, शिवनगर तसेच जिल्ह्यासह विदर्भात बहुरूपी समाज मोठ्या संख्येने आहे. मागील ५० वर्र्षांपासून हा समाज विशिष्ट भागात स्थायिक झाला नाही. भटक्या अवस्थेत राहिल्याने शासन दरबारी या समाजाची नोंद नव्हती. तब्बल ३० वर्षांनंतर या समाजातील नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळाला. यानंतरही शासकीय योजनांपासून हा समाज वंचित आहे. अद्यापही या समाजाला सरकारकडून कोणताच लाभ देण्यात आलेला नाही. प्रशासन व लोक प्रतिनिधींना वारंवार निवेदन देण्यात आले, पण यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही. यामुळे हा समाज आजवर उपेक्षित राहिला. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकास साध्य करता आला नाही.
यासंर्भात जिल्ह्यातील बहुरूपी समाजबांधवांनी आमदार डॉ. पंकज भोयर यांना निवेदन सादर केले. आ. डॉ. भोयर यांनी समाजाच्या समस्या लक्षात घेऊन हिवाळी अधिवेशन दरम्यान बैठकीचे आयोजन केले. या बैठकीला सामाजिक न्याय मंत्री ना. दिलीप कांबळे, सामाजिक न्याय विभाग सहसचिव लोणारे, अपर सचिव लुबाळ, वर्धा समाज कल्याण उपायुक्त देशमुख, बहुरूपी समाजाचे ताराचंद माहुरे, प्रशांत शिंदे आदी उपस्थित होते.
या बैठकीत आ. भोयर यांनी समाजाच्या समस्या ना. कांबळे यांच्यासमोर मांडल्या. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरिता शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आवश्यक आहे. घरकूल नसल्यामुळे त्यांना उघड्यावर रहावे लागते. तसेच जातीचे प्रमाणपत्र नसल्याने शैक्षणिक व अन्य सुविधा मिळत नाही. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ना. कांबळे यांनी या समाजाला घरकुल देण्याची कार्यवाही करावी, त्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी संबंधित विभागाला निर्देश देण्यात येईल, असे आश्वासन सभेला उपस्थितांना दिले.
यावेळी बाबाराव तडस, गुंडू कावळे, निरंजन कदम, पवन जगताप, विष्णु माहुरे, ज्ञानेश्वर सुरतकर, हेमंत जगताप, भारत सुरतकार, संजय शिंदे, राजकन्या माहुरे, प्रभाकर शिंदे, बबन शिंदे, भारत माहुरे, पवन माहुरे यांच्यासह समाजातील नागरिक उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)