शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेअभावी आरोग्य धोक्यात

By admin | Updated: December 10, 2014 23:02 IST

देशभर स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे़ शासकीय कर्मचाऱ्यांसह शाळेतील विद्यार्थीही यात सहभागी होत आहे़ अनेक ग्रामपंचयतींनीही स्वच्छता अभियान राबविले; पण गावात स्वच्छतेला बगल दिली

वायगाव (नि़) : देशभर स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे़ शासकीय कर्मचाऱ्यांसह शाळेतील विद्यार्थीही यात सहभागी होत आहे़ अनेक ग्रामपंचयतींनीही स्वच्छता अभियान राबविले; पण गावात स्वच्छतेला बगल दिली जात असल्याचेच दिसते़ यामुळेच गावात घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ ग्रा़पं़ प्रशासनाने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़
स्थानिक वॉर्ड क्रमांक ६ मधील हनुमान देवस्थानाजवळ अस्वच्छतेचा कळस आहे़ आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह ग्रा़पं़ प्रशासनही दुर्लक्ष करीत असल्याने घाणीच्या साम्राज्यात वाढ होत आहे़ यामुळे साथीच्या आजाराचा प्रकोप होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ साथीच्या आजाराचा उद्रेक झाल्यानंतर वॉर्डात स्वच्छता करण्यात येणार काय, असा प्रश्न नागरिकांद्वारे उपस्थित केला जात आहे़ सध्या वॉर्ड क्ऱ ६ मध्ये नाल्या तुंबल्या असून नालीतील सांडपाणी व किडे परिसरातील घरांमध्ये शिरत असल्याचे दिसते़
गावात अनेक ठिकाणी अस्वच्छता पसरलेली आहे़ रस्त्यावर साचलेला कचरा आणि नालीतील सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना तोंडाला रूमाल लावूनच ये-जा करावी लागते़ कित्येक दिवसांपासून नाल्या न उपसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे़ विशेषत: वॉर्ड क्रमांक ६ हा सरपंचाचा आहे़ या परिसरापासून काही अंतरावर सरपंचाचे घर असताना अस्वच्छता पसरल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत़ नालीतील सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून चिमुकल्यांसह वृद्धांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे़ काही नागरिकांच्या स्वयंपाक घरात नालीतील किडे आढळून आल्याने गावात असंतोष पसरला आहे़ याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या; पण ग्रामपंचायत प्रशासन याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचे दिसते़ यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सह्यांचे निवेदन जिल्हा आरोग्य अधिकारी, ग्रा़पं़ प्रशासनास सादर केले असून निवेदनाच्या प्रती मंत्र्यांनाही पाठविल्या आहेत़
गावात स्वच्छता अभियान राबविण्यात यावे, तसेच नाल्यांची सफाई करून नाल्या वाहत्या करण्यात याव्या अशी मागणी प्रमोद, हरणे, सुरेश ढोले, मोहन वांदाडे, उल्हासराव तलमले, शालिक वरघणे, सुधाकर चांभारे, गणेश देवतळे यांच्यासह नागरिकांनी निवेदनातून केली आहे़(वार्ताहर)