शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्ष व सचिव पदावरुन ग्रामसभेत वाद, सभा तहकूब

By admin | Updated: February 7, 2015 01:21 IST

पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे गठण करण्याकरिता येथील सिद्देश्वर मंदिरात शुक्रवारी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.

नाचणगाव : पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे गठण करण्याकरिता येथील सिद्देश्वर मंदिरात शुक्रवारी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेचे कामकाज सुरू असताना समितीचे अध्यक्ष व सचिवपद मिळण्याकरिता समितीतील सदस्यात वाद झाल्याने महिला व पुरूष सदस्य आमने-सामने आले. हा वाद चिघळतच गेल्याने अखेर ही सभाही तहकूब करण्यात आली. शासन निर्णयानुसार पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची स्थापना ही ग्रामसभेतून करण्यात यावी, असे आदेश आहेत. त्यानुसार सदर समितीची स्थापना करण्यासाठी ग्रामपंचायत नाचणगाव मार्फत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. प्रशासनाने या सभेसाठी व्हिडिओ चित्रिकरण तसेच पोलीस बंदोबस्ताचे प्रयोजन केले होते. अधिकारानुसार ग्रामसेवकाने सभेच्या अध्यक्षपदी उपसरपंच तुषार पेंढारकर यांची निवड केली. सभेला पंचायत समिती स्तरावरून विस्तार अधिकारी दीपक चौधरी तसेच ग्रामविकास अधिकारी बोबडे उपस्थित होते. ग्रामसभेच्या निर्णयानुसार २४ सदस्यीय कमिटी गठित करताना ५० टक्के महिला, एकतृतीयांश ग्रा.पं. सदस्य व इतर चार असा समावेश करून २२ सदस्यांची निवड करण्यात आली. प्रत्येक वॉर्डाला प्रतिनिधित्व मिळावे याची दक्षताही घेण्यात आली. अध्यक्ष व सचिवाच्या निवडीदरम्यान समितीच्या २२ सदस्यातून त्यांची निवड करावी, ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड करावी, महिलांची उपस्थिती असल्याने त्यांना प्राधाण्य द्यावे, समितीत शासनाचा प्रतिनिधी कुणीही नाही, मग पाणीपुरवठा व स्वच्छता समितीबाबत विचाराचे कुणाला अशा एका ना अनेक विषयावर वाद झाला. ग्रामपंचायत सरपंच अध्यक्ष तर ग्रामविकास अधिकारी सचिव हा पर्यायही समोर आला. या विविध पर्यायामुळे एकमत होवू न शकल्यामुळे सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसताच अध्यक्षाने पुढील तारीख घोषित करेपर्यंत सभा तहकूब केली.(वार्ताहर)