शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गांधी विचारांना कृतीची जोड हवी

By admin | Updated: August 14, 2014 23:52 IST

देशाला स्वातंत्र मिळाले; पण त्यापुढे जाऊन गांधी विचार हा वैश्विक आहे़ यामुळे त्याला कृतीशी जोड देणे गरजेचे आहे़ हिंदी स्वराज्य पुस्तक वाचावे़ त्यातून गांधी विचारांची प्राप्ती होते,

अध्ययन केंद्रास प्रारंभ : सुगन बरंठ यांचे मतवर्धा : देशाला स्वातंत्र मिळाले; पण त्यापुढे जाऊन गांधी विचार हा वैश्विक आहे़ यामुळे त्याला कृतीशी जोड देणे गरजेचे आहे़ हिंदी स्वराज्य पुस्तक वाचावे़ त्यातून गांधी विचारांची प्राप्ती होते, असे प्रतिपादन नई तालीम समितीचे अध्यक्ष डॉ़ सुगन बरंठ यांनी केले़न्यू आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज येथे महत्मा गांधी अध्ययन केंद्राचे त्यांच्या हस्ते करण्यात आले़ झाले. यावेळी ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी डॉ. आर.जी. भोयर तर प्रमुख अतिथी म्हणून म़ गांधी औद्योगिकरण संस्थानचे निदेशक डॉ. पी.बी. काळे, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठाणचे मंत्री डॉ़ श्रीराम जाधव, माजी प्राचार्य प्रा. व्ही.के. पांडे, डॉ. पंकज भोयर, हिंदी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. देवराज, महात्मा गांधी अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. प्रशांत कडवे आदी उपस्थित होते.पूढे बोलताना डॉ़ सुगन बरंठ यांनी महात्मा गांधींच्या विविध पैलूवरही उपस्थितांना मार्गदर्शन केले डॉ. पी.बी. काळे यांनी पाणी, वीज वाचविण्याकरिता प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. खादी वस्त्राचा वापर करावा व तरूण पिढीने खेड्याकडे जाऊन गांधी विचार आत्मसात करणे गरजेचे आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे, असे सांगितले़ डॉ. श्रीराम जाधव यांनी खादी एक कापड नाही, एक विचार आहे़ खादीचे हे महत्त्व या अर्थाने त्यांनी उपस्थिताना पटवून दिले. गांधीजींच्या विचारातून व्यापक दृष्टीकोण मिळविला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले़ प्रा. व्ही.के. पांडे यांनी गांधीजी प्रसिद्ध साहित्यिक होते. त्यांची कृती सत्यात उतरविणे खरोखरच कठीण आहे; पण सामान्यांनी ते अंगिकारले पाहिजे, असे सांगितले़ डॉ. आर.जी. भोयर यांनी गांधीजींच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्याच्या दृष्टीने अशा प्रकारच्या अध्ययन केंद्राची अधिकाधिक ठिकाणी निर्मिती व्हावी व त्यातून गांधीजींचे विचार आत्मसात करावे, असे सांगितले़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. प्रशांत कडवे यांनी केले. संचालन डॉ. वंदना पळसापुरे यांनी केले तर आभार डॉ. मदन इंगळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)