शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवा

By admin | Updated: December 10, 2014 23:03 IST

ग्रामरोजगार सेवकांना दरमहा आठ हजार रुपये मानधन मिळावे, त्यांचा स्वतंत्र प्रवासभत्ता, मिटिंग भत्ता देण्यात यावा. ग्राम सेवकांच्या रिक्त जागेवर रोजगार सेवकांना पदोन्नती देताना वयाची अट शिथील करावी,

वर्धा : ग्रामरोजगार सेवकांना दरमहा आठ हजार रुपये मानधन मिळावे, त्यांचा स्वतंत्र प्रवासभत्ता, मिटिंग भत्ता देण्यात यावा. ग्राम सेवकांच्या रिक्त जागेवर रोजगार सेवकांना पदोन्नती देताना वयाची अट शिथील करावी, दुष्काळी स्थितीचा विचार करता शेतकऱ्यांच्या शेतातील कामे, रोजगार हमी योजनेत सामावून घ्यावी आदींसह अनेक मागण्यांचे निवेदन ग्रामरोजगार सेवकांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांना सादर करण्यात आले.
ग्रामरोजगार सेवकांच्या अनेक समस्या शासनाकडे प्रलंबित आहे. वारंवार मागण्या करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नुकतेच यासंदर्भात जॉब कार्डधारक मजुरांना २७२ रुपये बिज व्याजी कर्ज बँकेतून देण्यात यावे, अशा आशयाच्या मागण्यांचे निवेदन ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांना देण्यात आले आहे. वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने काम बंद आंदोलनाची सूचना देण्यात आली आहे. यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयावर १५ डिसेंबर रोजी ग्रामरोजगार सेवक व जॉब कार्डधारक मजुरांचा मोर्चा काढला जाणार आहे.
निवेदन देताना शिष्टमंडळात प्रा. राजू गोरडे, रमेश जयसिंगपुरे, विनायक नन्नोरे, किशोर चिमुरकर, संतोष शिखरे, भिमराव ओंकार राजकुमार कांबळे, नितेश टेकाम, सुनील गावंडे, सुधाकर बोबडे, प्रदीप अळसापुरे, प्रकाश येळणे, विजय उईके, देवानंद पाटील, अशोक गोटे, नीलेश नाईक, सतीश गेडाम आदी उपस्थित होते.
या मोर्चात जिल्ह्यातील सर्वच ग्रामरोजगार सेवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ग्रामरोजगार व आॅपरेटर युनियनच्या वतीने करण्यात आली आहे.(शहर प्रतिनिधी)