शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
4
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
5
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
6
मुलावर एकाधिकार दाखवण्याच्या आईच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाची चिंता; वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार ठेवला कायम 
7
Prateek Yadav : शाळेत मैत्री, ई-मेलवर प्रेम अन् १० वर्षांचा रोमान्स! अशी होती प्रतीक आणि अपर्णा यादव यांची लव्ह स्टोरी
8
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
9
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
10
Central Railway: आसनक्षमता ७२, प्रवाशांची संख्या ४००; ‘टीसी’वर ताण; टार्गेट आणि वाढत्या हल्ल्यांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
11
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
12
अधिक मास २०२६: संकल्पपूर्तीसाठी अधिक मासात गुरुचरित्राचे 'हे' निवडक अध्याय वाचणेदेखील ठरेल प्रभावी!
13
सिद्धार्थ जाधवच्या पत्नीला पाहिलंत का? बिजनेसवुमन आहे तृप्ती, करते 'हे' काम
14
Prateek Yadav : "कौटुंबिक वादानंतर डिप्रेशन…"; १३ वर्षे सोबत असलेल्या प्रतीक यादव यांच्या मित्राचा गौप्यस्फोट
15
राजकारणापासून दूर..; प्रतीक यादव काय काम करायचे? किती होती त्यांची संपत्ती? जाणून घ्या...
16
किती लाजिरवाणं आहे! 'कान्स'च्या रेड कार्पेटवर आलिया भटकडे फोटोग्राफर्सचं दुर्लक्ष? व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांचा चीनला मोठा इशारा! जिनपिंगना भेटण्यापूर्वीच इराणबाबत ठणकावून सांगितलं; काय म्हणाले?
18
Pune Nasrapur Case : सीसीटीव्ही, ‘शेव’ आणि टणक वस्तू...; नसरापूर प्रकरणात आणखी कोण सामील ?
19
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
20
ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे पद धोक्यात; गंभीर आरोप करत ८० मंत्र्यांनी फडकावले बंडाचे निशाण
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीमुळे अर्थव्यवस्था प्रभावी होतेय

By admin | Updated: December 11, 2014 23:13 IST

संगणकाद्वारे विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीचा प्रभाव वाढत असून संरक्षण, रेल्वे, बांधकाम, विमानसेवा अशा विविध क्षेत्रात त्याचा अंतर्भाव होताना दिसत आहे, असे मत प्रमुख उद्घाटक डॉ. निलकंठ पेंडसे यांनी

सेलू : संगणकाद्वारे विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीचा प्रभाव वाढत असून संरक्षण, रेल्वे, बांधकाम, विमानसेवा अशा विविध क्षेत्रात त्याचा अंतर्भाव होताना दिसत आहे, असे मत प्रमुख उद्घाटक डॉ. निलकंठ पेंडसे यांनी व्यक्त केले. विदेशी गुंतवणुकीवर राष्ट्रीय चर्चासत्रात त्यांनी या माध्यमातून प्रकाश टाकला.
येथील यशवंत महाविद्यालयात विद्यापीठ अनुदान आयोग यांच्यावतीने ‘आर्थिक सुधारणेनंतर भारतातील विदेशी प्रत्यक्ष गुतवणूक व त्यांचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आले. चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. विलास देशमुख, कला वाणिज्य महाविद्यालय, कारंजा (घा.) चे प्राचार्य डॉ. संजय धनवटे, डॉ. इंदुरवाडे, प्राचार्य डॉ. किशोर अहेर समन्वयक प्रा. सतिश रघुवंशी उपस्थित होते.
डॉ. विलास देशमुख यांनी गुंतवणुकीसोबत सांस्कृतिक क्षेत्रात होणारा बदल भारतीय लोकांच्या भावी पिढीवर जास्त प्रतिकूल प्रभाव वाढवित आहे, असा खेद व्यक्त केला. डॉ. अहेर यांनी ही विदेशी गुंतवणूक आर्थिक विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने महत्वाची आहे, पण यासोबत देशातील उद्योजकांना उत्पादकांना अधिक जास्त दक्षता बाळगण्याची गरज आहे, असे आवाहन केले.
प्रास्ताविक प्रा. सतिश रघुवंशी यांनी केले. संचालन प्रा. कृष्णा दीक्षित यांनी केले तर आभार प्रा. अनंत रिढे यांनी मानले.
चर्चासत्राच्या द्वितीय भागात विविध महाविद्यालयातील प्राध्यापकांनी शोधनिबंधाचे वाचन केले. यावेळी अध्यक्षस्थानी प्रा. हरिदास धुर्वे होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. करमसिंग राजपूरे उपस्थित होते. विदेशी गुंतवणुकीचा वाढता प्रभाव व त्याचे होणारे भावी परिणाम या अनुषंगाने विविध पैलूवर प्रकाश टाकण्यात आला. या सत्राचे संचालन प्रा. वसंत राठोड यांनी केले व प्रा. नरेंद्र जाधव यांनी आभार मानले.
समारोपीय कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रा. प्रकाश नाथे होते. विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुक टाळणे अशक्य आहे. याउलट स्पर्धेच्या युगात आपली उत्पादकता वाढविण्याला पर्याय नाही, असा सूर उमटला. संचालन डॉ. अर्चना फाळके यांनी केले तर प्रा. राजेंद्र मुंढे यांनी सर्वाचे आभार मानले. चर्चासत्रात सादर शोधनिबंधाची स्मरणिका काढली. यावेळी प्रा. भगत, प्रा. दिक्षीत, प्रा. फाळके, खोब्रागडे, हुमणे आदींनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)