शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक मदतीसाठी शेतकऱ्याची पायपीट

By admin | Updated: June 14, 2014 23:47 IST

नजिकच्या कानगाव येथील रहिवासी भाऊराव महादेव भरडे (६५) यांची मौजा कानगाव येथे ५ एकर शेती आहे. दि.२० मे रोजी अचानक वादळ व विजेच्या कडकडाट झाला. वादळात शेतातील गोठ्यावर वीज पडली.

वायगाव (नि.) : नजिकच्या कानगाव येथील रहिवासी भाऊराव महादेव भरडे (६५) यांची मौजा कानगाव येथे ५ एकर शेती आहे. दि.२० मे रोजी अचानक वादळ व विजेच्या कडकडाट झाला. वादळात शेतातील गोठ्यावर वीज पडली. विद्युत स्पार्किंग गोठ्याला आग लागल्याने सदर शेतकऱ्याचे दीड लाखांच्या घरात नुकसान झाले. एकाएकी आलेल्या या संकटामुळे सदर शेतकरी हतबल झाला आहे.या आगीत १ गाय, १ बैल, १० कोंबड्या या मृत पावल्या. त्या गोठ्यातील पिव्हीसी पाईप ६०० फूट, जनावरांचा कडबा - कुटार व शेतात टाकण्यासाठी ठेवलेले बि-बियाणे व शेती उपयोगी साहित्य भस्म झाले. मात्र १ बैलाला गावकऱ्यांनी वाचवले. तो बैल सुद्धा गंभीर जखमी आहे. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले. शेती गावाच्या बाहेर असल्याने व कोणालाही दिसली नाही. मात्र आगीने उग्ररूप धारण केल्यामुळे ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आली. त्यात शेतकऱ्यासह ग्रामस्थ घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत उशिर झाला होता.भाऊराव भरडे हा अल्प भूदारक शेतकरी आहे. गेल्या दोन वर्षापासून नापिकीला तोंड देत आहे. गेल्या वर्षी तोंडी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला. अशातच भाऊराव भरडे या शेतकऱ्यावर बँक आॅफ इंडिया बँकेचे १ लाख रूपये कर्ज असून खाजगी कर्ज अंदाजे २ लाखांच्या जवळपास आहे. मात्र नापिकीने त्याचे कर्ज फेडणे शक्य झाले नाही. त्यात पुन्हा नवीन संकट आल्याने शेतकरी भाऊराव भरडे हा हवालदील झाला आहे. आता नव्याने उभे होण्यासाठी शेती करण्यासाठी बैल जोडी, बि-बियाणे, खत कसे घ्यावे व शेती कशी करायची हा प्रश्नच उभा झाला आहे. सदर शेतकऱ्याने पालकमंत्री, खासदार व तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिली. मात्र काहीही उपयोग झाला नाही. न्याय मिळावा यासाठी सतत येरझारा मारत असून अजूनही अजूनही यावर अधिकारी लक्ष देण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येते. तरी संबंधीत अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.(वार्ताहर)