शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल चोरटा ‘लल्या’ लागला शहर पोलिसांच्या गळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 06:00 IST

समतानगर सावंगी (मेघे) येथील अशोक ओंकार हे त्यांच्या कुटुंबियांसह मोठ्या मुलीकडे जावायांना भेटण्यासाठी चंद्रपूर येथे गेले होते. याच कालावधीत कुलूपबंद घराला टार्गेट करून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घरातील रोख १७ हजार आणि २४ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र असा एकूण ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार ओंकार यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली.

ठळक मुद्देचोरीचा मुद्देमाल जप्त : तीन ठिकाणी चोरी केल्याची दिली कबुली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : घरफोड्या करण्यात तरबेज असलेल्या अनिकेत उर्फ लल्या विनोद बोंबले (१९) रा. भिमनगर वॉर्ड, सावंगी (मेघे) याला अटक करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. एका चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाला गती देत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने दोन चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. शिवाय त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल शहर पोलिसांनी जप्त केला आहे.समतानगर सावंगी (मेघे) येथील अशोक ओंकार हे त्यांच्या कुटुंबियांसह मोठ्या मुलीकडे जावायांना भेटण्यासाठी चंद्रपूर येथे गेले होते. याच कालावधीत कुलूपबंद घराला टार्गेट करून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घरातील रोख १७ हजार आणि २४ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र असा एकूण ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार ओंकार यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. तसेच आरती प्रल्हाद भोयर (३९) रा. श्रीवास्तव अपार्टमेंट, समतानगर, वर्धा या कर्तव्यावर गेल्या असता त्यांच्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून घरातील साहित्य अस्ताव्यस्त करीत चोरीचा प्रयत्न केल्याची तक्रार आरती भोयर यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. या दोन्ही तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेत शहर पोलिसांनी तपास सुरू केला असता खात्रीदायक माहितीच्या आधारे अनिकेत उर्फ लल्या विनोद बोंबले याजा पोलिसांनी ताब्यात घेतले. शिवाय पोलिसी हिसका देत विचारपूस केली असता त्याने सदर दोन्ही गुन्ह्याची कबुली दिली. शिवाय त्याने सावंगी भागातील भगत यांच्या घरीही चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्याच्याकडून पोलिसांनी २४ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, ५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे कानातले, १ सोन्याची बाही व रोख २ हजार ५०० रुपये असा एकूण ३७ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश पारधी यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस स्टेशनचे बाबाराव बोरकुटे, संजय पंचभाई, मंगेश झामरे, महादेव सानप, सचिन देवतळे, गितेश देवघरे, विकास मुंडे, विजय काळे, निखिल वासेकर यांनी केली.

टॅग्स :Thiefचोर