शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत आढळला तरूणाचा मृतदेह

By admin | Updated: October 13, 2016 01:17 IST

हिंंगणी-नानबर्डी मार्गावरील नितीन निघडे यांच्या शेतातील विहिरीत युवकाचा मृतदेह आढळून आला.

घातपाताची शक्यता : नानबर्डी शिवारातील घटनाबोरधरण : हिंंगणी-नानबर्डी मार्गावरील नितीन निघडे यांच्या शेतातील विहिरीत युवकाचा मृतदेह आढळून आला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. प्रशांत किशोर गोडबोले (२०) रा. रेहकी, असे मृतकाचे नाव आहे.मोलमजुरीचे काम करणारा प्रशांत शनिवारी घरातून बाहेर पडला. कामावर जातो म्हणून जेवणाचा डबा व कामावर घालण्यासाठी कपडे सोबत होते; पण तो त्या दिवसापासून घरी परतलाच नाही. मंगळवारी त्याचा निघडे यांच्या शेतातील विहीरीत सकाळी फिरण्यास गेलेल्या दीपक शंभरकर यांना मृतदेहच आढळला. त्यांनी याबाबत पोलीस पाटील मारोती चचाने यांना माहिती दिली. पोलीस पाटलांनी सेलू पोलिसांना सूचना दिली. निघडे यांनी पोलिसात लेखी तक्रार नोंदविली. सेलू पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह बाहेर काढला. त्याच्या फुलपँटच्या खिशात उंदीर मारण्याच्या औषधाची पुडी आढळली. चप्पला विहिरीत होत्या. सदर तरुणाची आत्महत्या की घातपात, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल. पूढील तपास ठाणेदार विलास काळे यांच्या मार्गदर्शनात सेलू पोलीस करीत आहे.(वार्ताहर)वर्धेच्या तरूणाचा बोरधरणात बुडून मृत्यूमित्रासोबत वर्धा येथून बोरधरणला आलेल्या तरुणाला पोहण्याचा मोह आवरला नाही. यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी २ वाजता घडली. नितीन रमेश निकोडे (३४) रा. साईनगर वर्धा असे मृतकाचे नाव आहे. तो पाच मित्रांसह बोरधरण येथे आला. सर्व मित्र धरण पाहत असताना नितीन पोहण्यासाठी पाण्यात उतरला. त्याला पोहता येत नसताना मित्रांनी अडविले नाही. पाचही मित्रांच्या डोळ्यासमोर नितीनचा बुडून मृत्यू झाला. मित्रांनी याबाबत सेलू पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. पुढील तपास सेलू पोलीस करीत आहेत.