शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अन् प्लास्टिकने काही क्षणात घेतला कबुतराचा बळी!

By admin | Updated: December 27, 2015 02:27 IST

कचऱ्यात आपले अन्न शोधणाऱ्या एका कबुतराच्या गळ्यात प्लास्टिक अडकले. कबुतराने आकाशात झेप घेण्याचा प्रयत्न केला

राजेश भोजेकर वर्धा
कचऱ्यात आपले अन्न शोधणाऱ्या एका कबुतराच्या गळ्यात प्लास्टिक अडकले. कबुतराने आकाशात झेप घेण्याचा प्रयत्न केला असता त्या प्लास्टिकमध्ये हवा शिरल्याने तो जमिनीपासून सुमारे ३-४ फूट अंतरापर्यतच उडू शकत होता. ही बाब एका तरुणाच्या लक्षात येताच त्याने कबुतराला पकडून त्याची प्लास्टिकपासून सुटका करण्यासाठी धडपड केली; पण अचानक भरधाव चार चाकी वाहन आले. गळ्यात प्लास्टिक असल्यामुळे सैरभर झालेले ते कबुतर त्या वाहनाच्या काचावर धडकले आणि खाली पडले तर त्याच्या अंगावरून वाहनाचे चाक गेले. यात तो तडफडून जागीच गतप्राण झाला. या ठिकाणी एखादी व्यक्ती असती तर एकच गर्दी झाली असती आणि सर्वांनी त्या वाहन चालकाला पकडून चोपले असते. आणखी काय काय केले असते, हे सर्वांनाच ठाऊक आहे; मात्र त्या मुक्या जिवाची काय पर्वा. काहींनी अरेरे.. म्हणत पूढे जाणेच पसंत केले. त्या तरूणाने त्या कबुतराला उचलून बघितले असता त्याच्या गळ्यात प्लास्टिक अडकलेले होते. शनिवारी सकाळी ११.४० वाजता ठाकरे मार्केटपुढे घडलेल्या या घटनेला वाहनचालक जबाबदार की प्लास्टिक रस्त्यावर फेकणारा, हा गंभीर सवाल सर्वांना सतावणारा ठरला.
कायद्याने प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे. प्लास्टिक वापरू नये म्हणून पालिकाही आवाहन करते. इतकेच नव्हे तर, जो दुकानदार ग्राहकांना प्लास्टिक देतो वा विकतो त्यांच्यावर कारवाईही केली जाते; पण ठोठावलेला दंड भरून पुन्हा गुन्हा करण्यास दुकानदार मोकळे होतात. प्लास्टिक बंदी कशासाठी, याचा जराही विचार करताना कुणी दिसत नाही.
पूर्वीच्या नागरिकांप्रमाणे आता सर्वांनाच हातात कापडी पिशव्या घेऊन जाण्याची लाज वाटते. आपल्या लाजेखातर दुसऱ्याचा जीवही जाऊ शकतो, याचे शल्य मात्र कुणाच्याही मनाला बोचताना दिसत नाही. ग्राहकांना चांगली सेवा देण्याच्या नावावर उच्च प्रतीचे प्लास्टिक दुकानात ठेवले जाते.
या प्लास्टिकचा वापर झाल्यानंतर ते नष्ट केले पाहिजे, ही काळजी कुणीही घेताना दिसत नाही. याबाबतची जनजागृतीही झालेली नाही, ही वास्तविकता आहे. भाजीपाल्यापासून तर कापडाच्या दुकानापर्यंत व इतरही सर्व प्रकारच्या दुकानांमध्ये बंदी असताना नियमबाह्य असलेल्या प्लास्टिकचा बिनबोभाटपणे वापर केला जात आहे. हा प्रश्न कारवाईने सुटणारा असता तर आतापर्यंत प्लास्टिक बाजारातून हद्दपार झाले असते. ते मनातून करावे लागते.
मग, हेच प्लास्टिक रस्त्यावर फेकल्यानंतर जनावरे खातात. त्यांच्या पोटातून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक निघल्याच्या घटना ऐकून आश्चर्य करताना सारेच दिसतात; पण प्लास्टिकचा त्याग करण्याची मनीषा कुणीच बाळगताना दिसत नाही. परिणामी, आकाशात उडणाऱ्या पक्ष्यालाही आपला नाहक जीव गमवावा लागतो. याचा विचार करण्याची सवड कुणाजवळ आहे!