शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ऐश्वर्या महाजन जिल्ह्यात पहिली

By admin | Updated: June 18, 2014 00:19 IST

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला़ यात रत्नीबाई विद्यालयाची विद्यार्थिनी ऐश्वर्या अनिल महाजन हिने जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. तिने ९८ टक्के गुण प्राप्त केले

वर्धा : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला़ यात रत्नीबाई विद्यालयाची विद्यार्थिनी ऐश्वर्या अनिल महाजन हिने जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. तिने ९८ टक्के गुण प्राप्त केले आहेत. द्वितीय स्थानावर सुशील हिंमतसिंगका विद्यालयाचा विद्यार्थी आशुतोष सुरेश जवादे असून त्याने ९७ टक्के गुण प्राप्त केले तर तिसऱ्या स्थानावर सेंट जॉन हायस्कूल हिंगणघाटचा विद्यार्थी पंकज काटकर असून त्याने ९६.२० टक्के गुण प्राप्त केलेत.गत वर्षीप्रमाणे यंदाही मुलीच अव्वल ठरल्या़ जिल्ह्याच्या निकालात यंदा भर पडली असून ८०.२७ टक्के लागला आहे. यात मुलीच्या उत्तीर्णतेच्या प्रमाणात वाढ झाली असून मुलांपेक्षा मुलीच समोर असल्याचे निकालातून दिसून आले. शैक्षणिक जीवनाला कलाटणी देणारी ही महत्त्वाची परीक्षा असल्याने मुलांना निकालाची आतुरतेने प्रतीक्षा होती़ ती मंगळवारी संपली. नागपूर विभागाचा निकाल दुपारी १ वाजता आॅनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. आपला निकाल माहिती करून घेण्याकरिता विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिसरातील एमकेसीएलच्या संगणक केंद्रांवर एकच गर्दी केली होती़ जिल्ह्यातील ७६४ शाळांतून १९ हजार २४६ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होता़ यात १९ हजार १६३ विद्यार्थ्यांनी ७४ परीक्षा केंद्रांतून परीक्षा दिली. यातील ६९ नियमित आणि ५ परीक्षा केंद्र जुन्या अभ्यासक्रमासाठी होते. यातील १५ हजार ३८३ विद्यार्थ्यांनी यश मिळविले तर ३ हजार ७८० विद्यार्थांना उत्तीर्ण होता आले नाही. यात ७५ टक्केपेक्षा अधिक गुण मिळवित प्राविण्यासह उत्तीर्ण होणारे २ हजार ३९९ विद्यार्थी आहेत. ग्रेड वनमध्ये ५ हजार ४२९ विद्यार्थी, गे्रड टु मध्ये ६ हजार १६२ विद्यार्थी असून केवळ उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ हजार ३९३ आहे. जुन्या अभ्यासक्रमात ३ हजार ७३० विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले. पैकी ३ हजार ७२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात ७१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ग्रेड वनमध्ये ५, गे्रड टु मध्ये १० तर ६९५ विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झाले. जुन्या अभ्यासक्रमामध्येही मुलींचीच सरशी दिसून येते. जुन्या अभ्यासक्रमात २ हजार ३१६ मुलांनी परीक्षा दिली. यात ३६७ मुले उत्तीर्ण झाली. १ हजार ४११ मुलींपैकी ३४३ मुली उत्तीर्ण झाल्यात. जुन्या अभ्यासक्रमात उत्तीर्ण मुलांची १५.८५ तर मुलींची टक्केवारी २४.३१ आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)