शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

आठ कोटींच्या योजनेनंतरही तहान कायम

By admin | Updated: May 24, 2015 02:27 IST

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मार्च २०११ मध्ये गावात ८ कोटी २४ लाख रुपयांच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या शुभारंभाचा नारळ फोडला.

योगेश वरभे अल्लीपूरमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मार्च २०११ मध्ये गावात ८ कोटी २४ लाख रुपयांच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या शुभारंभाचा नारळ फोडला. याला चार वर्षांचा कालावधी होत असला तरी योजनेतील पाण्याचा एकही थेंब गावकऱ्यांच्या नळाला पोहोचला नाही. यामुळे पाणी टंचाईचे चटके या गावातील नागरिकांना सोसावे लागत आहे. या योजनेत वर्धा नदीच्या कात्री येथील डोहातून पाणी घेण्याचा निर्णय झाला होता. याकरिता टाकण्यात येणार असलेली पाईप लाईन व शुद्धीकरणाकरिता उभारण्यात येणार असलेल्या फिल्टर प्लॉन्टच्या टाकीचे काम अद्यापही अपूर्णच आहे.मनसावळी, भगवा, काचनगाव, पवनी, अलमडोह, अल्लीपूर, मार्वी ही सात गावे प्राधिकरणाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पाण्यासाठी गावात रोज तंटे होताना दिसत आहे. ग्रामपंचायतीच्या २ लाख २६ हजार लीटर क्षमतेच्या टाकीच्या जोरावर गावकऱ्यांची तहाण भागविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या टाकीत यशोदा नदीवरून पाणी पुरवठा होत आहे. यात ऐन पाणी टंचाईच्या तोंडावर कोल्हापूरी बंधाऱ्याचे पाणी सोडल्याने यशोदा नदी कोरडी झाली आहे. त्यामुळे येथील पाणी पुरवठा योजना शेवटचे आचके घेत आहे. गावात १४ सार्वजनिक विहिरी असून त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. यात मोठ्या प्रमाणात क्षार आहे. यातील पाणी नागरिकांकडून वापराकरिता घेण्यात येत आहे; मात्र पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. महिलांचे पिण्याच्या पाण्याकरिता हाल होत आहे. पवनी येथील विहीर, यशोदा नदी, जीवन प्राधिकरण योजना आदी पाणी पुरवठ्याचे स्त्रोत आता धोक्यात आले आहे. यशोदा नदीचे पाणी कोल्हापूरी बंधाऱ्यातून सोडल्याने नदी कोरडी पडली आहे. प्राधिकरणचे पाणी गावात कात्री येथून येत आहे. यात जागोजागी असलेल्या पाईप लाईनचे लिकेज, भारनियमन व अपूर्ण काम यामुळे गत महिन्यापासून गावात तीव्र पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.विठ्ठल मंदिर भवानी वॉर्ड, गाळोबा वॉर्ड, सदानंद वॉर्डातील नागरिक पाण्यासाठी टाहो फोडीत आहेत. ग्रा.पं. प्रशासनाला पाणी टंचाईचा जाब विचारण्यासाठी महिला व नागरिकांनी ग्रा.पं. वर धडक दिली. यावेळी नागरिकांनी पाणी टंचाईचे निवारण करण्याची मागणी लावून धरली होती.