शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
जयंत पाटील यांचा CM देवेंद्र फडणवीसांना सल्ला; म्हणाले, “ताफ्यात फक्त एक कार अन्…”
3
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
4
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
5
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
6
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
7
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
8
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
9
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
10
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
11
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
12
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
13
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
14
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
15
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
16
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
17
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
18
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
19
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
20
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हातही न लावता ८४ पथदिवे होतात ‘आॅन-आॅफ’

By admin | Updated: December 31, 2015 02:22 IST

शहरासह जिल्ह्यात रात्री प्रकाश देण्यासाठी पथदिवे आहेत. हे पथदिवे रात्री सुरू व सकाळी बंद करण्यासाठी स्वतंत्र सजीव यंत्रणा आहे; ....

आधुनिक तंत्रज्ञान : नटाळा (पुनर्वसन) येथील पथदर्शी प्रकल्प ठरतोय वीज बचतीवर ‘रामबाण’
पराग मगर वर्धा
शहरासह जिल्ह्यात रात्री प्रकाश देण्यासाठी पथदिवे आहेत. हे पथदिवे रात्री सुरू व सकाळी बंद करण्यासाठी स्वतंत्र सजीव यंत्रणा आहे; पण हात न लावता सकाळी पथदिवे बंद व अंधार होताच ते सुरू झाले तर! सोबतच दिवे बंद व सुरू झाल्याचा संदेशही फोनवर आला तर! सर्वांना प्रश्न पडेल; पण ही किमया वर्धेतील उमेश कुबडे व पंकज दहीलकर या युवकांनी साकार करून दाखविली. तीदेखील नागरी सुविधांची वाणवा असलेल्या नटाळा (पुनर्वसन) सारख्या दुर्लक्षित गावात. आज हा पथदर्शी प्रकल्प कुठल्याही तांत्रिक अडचणींशिवाय सुरू असून जिल्ह्याला मार्गदर्शक ठरतोय.
वीज बचत ही काळाची गरज आहे; पण ती वाचविण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो, याचे उत्तर निराशाजनक असते. शहरात पथदिवे अनेकदा दिवसाही सुरूच असतात. यामुळे विजेचा अपव्यय होतो. अनेकदा बल्ब निकामी होतात. शहरात असे बल्ब लवकर बदलले जात असले तरी गावांत ही यंत्रणा इतकी मजबूत नाही. त्यातच पुनर्वसित गावांतील सुविधा तर विचारायला नको. यामुळे वीज वाचविण्यासाठी पथदिवेच स्वयंचलित केले तर, हा विचार पुनर्वसितांचे दु:ख झेललेल्या उमेश कुबडे या अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या युवकाच्या मनात घर करून होता. आपल्या ज्ञानाचा उपयोग एखाद्या पुनर्वसित गावासाठी व्हावा या हेतूने त्याने पंकज दहिलकर या सहकारी मित्राच्या सहकार्याने ‘सेंसरबेस आटोमॅटिक स्ट्रीट लाईट कंट्रोलर विथ एसएमएस नोटिफिकेशन’ हा ‘ईलेक्ट्रॉनिक प्रोग्राम’ तयार केला. आधी तो घरीच राबविला. यानंतर नटाळा येथील नागरिकांना विश्वासात घेत पथदिव्यांवर बसविला. अनेक दिवस अध्ययन करून तो ग्रामस्थांना सुपूर्द केला. आज या प्रोग्रामद्वारे नटाळा येथील ८४ पथदिवे दररोज सकाळी आपोआप बंद होऊन सायंकाळी अंधार पडल्यावर आपोआप सुरू होतात. एवढेच नव्हे तर पथदिवे बंद व सुरू झाल्याचा संदेशही येथील रहिवासी प्रवीण चोरे या इसमाच्या मोबाईलवर झळकतो.

काय आहे हा प्रोग्राम?

प्रकाशाची ‘इंटिग्रिटी’ सेंसरच्या साह्याने मोजून त्या आधारावर हा प्रोग्राम तयार करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रकाशाचा ‘लॅक्स’ मोजून किमान १८० ‘लॅक्स’ प्रकाशमानावर पथदिवे बंद तर सायंकाळी २४० ‘लॅक्स’ प्रकाशमानावर पथदिवे सुरू होण्याच्या सूचना यात देण्यात आल्यात. शिवाय तांत्रिक अडचणी आल्यावरही या प्रणालीवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, अशी सोयही करण्यात आली आहे.
अनेक अडचणींवर मात
सर्वप्रथम ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविताना याला कसा प्रतिसाद मिळणार याबाबत उमेश आणि पंकज या दोघांनाही साशंकताच होती. तरीही तीन दिवसांच्या परिश्रमानंतर पंकजने हा संपूर्ण हार्डवेअर प्रोग्राम आणि सॉफ्ट्वेअर कोडिंग केली. सुरुवातीला लॅक्स रुममध्ये तपासल्यामुळे बाहेरच्या प्रकाशात नेल्यावर त्यातून भराभर संदेश मोबाईलवर जात होते. तसेच सिस्टमही हँग होत होती. या सर्वांवर मात करीत अखेर उमेशने नटाळा येथील प्रवीण चोरे यांना विश्वासात घेत येथील डीपीवर ही मशीन बसविली. आज पंधरवड्यापासून ८४ पथदिवे दररोज हातही न लावता बंद व सुरू होत आहे. यासाठी त्यांना आशिष लबडे व प्रतिक इंगळे यांचेही सहकार्य मिळाले.

दोन हजार रुपयांत मशीन तयार
ही प्रोग्रामिंग मशीन तयार करण्यासाठी त्यांना अनेक छोटी-छोटी उपकरणे खरेदी करावी लागली. यामध्ये जीएसएम मॉडेल ७०० रुपये, मायक्रो कंट्रोलर ३०० रुपये, लाईट सेंसर १० रुपये, थ्री-फेज कंट्रोलर ९०० रुपये आणि पीसीबी २०० रुपये, असा एकूण २ हजार ११० रुपये खर्च आला.
विजेची बचत
या प्रोग्राममध्ये प्रकाशमानाचा लॅक्स अतिशय कमी ठेवण्यात आल्याने हे पथदिवे जेवढा प्रकाश कमी असतो तेवढेच अधिक उजळतात. त्यामुळे चंद्रप्रकाश असताना हे दिवे कमी प्रकाश फेकतात. परिणामी, विजेचीही बचत होण्यास मदत होते.