शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

२४ तासात लावला जबरी चोरीचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 21:55 IST

मारहाण करून दुचाकीसह मोबाईल व रोख रक्कम चोरून नेल्या प्रकरणी तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आपल्या तपासाला गती दिली. शिवाय अवघ्या २४ तासाच्या आत आरोपी असलेल्या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.

ठळक मुद्देतिघांना अटक : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मारहाण करून दुचाकीसह मोबाईल व रोख रक्कम चोरून नेल्या प्रकरणी तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आपल्या तपासाला गती दिली. शिवाय अवघ्या २४ तासाच्या आत आरोपी असलेल्या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.प्राप्त माहितीनुसार, बंडू मोहन भाजीखाये रा. हिंगणघाट हे नागसेननगर वर्धा येथून एम.एच.४० बी.एस. ४०५४ क्रमांकाच्या वाहनाने वाहन दुरूस्तीकरिता केसलीमल कन्या शाळेजवळील एका व्यावसायिक प्रतिष्ठानात जात होते. दरम्यान तीन ते चार अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या ताब्यातील वाहनाने बंडू याला कट देत खाली पाडले. त्यानंतर त्यांनी बंडू यांना मारहाण करून त्यांच्याजवळील वाहन, मोबाईल व ३ हजार रुपये रोख असा एकूण ६३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी बंडू भाजीखाये यांच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेतल्यानंतर सदर प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वळता करण्यात झाला. त्यानंतर पोलिसांनी आपल्या हालचालींना वेग देत गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी निरज मोरेश्वर मडकाम (२४), दीपक हरिदास तडस (२१) दोन्ही रा. न्यू रेल्वे कॉलनी याला सुरूवातीला ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून पोलिसांनी चोरीचा मोबाईल व रोख ३ हजार रुपये जप्त केले. त्यानंतर त्याच्याच कबुलीवरून पोलिसांनी नागसेननगर येथील राकेश वसंतराव सयाम (१९) यास ताब्यात घेतले. चोरीचे वाहन आरोपींनी संगणमत करून १५ हजार रुपयांमध्ये गहाण ठेवल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास वर्धा शहर पोलीस करीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. तेली, अपर पोलीस अधीक्षक पिंगळे, स्था.गु.शाखेचे पीआय निलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात पोहवा निरंजन वरभे, यशवंत गोल्हर, रितेश शर्मा, संघसेन कांबळे, विकास अवचट, राकेश आष्टनकर आदींनी केली. 

टॅग्स :Thiefचोर