शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

करमणूक करातून १.८३ कोटींची कमाई

By admin | Updated: April 4, 2017 01:15 IST

जिल्ह्यात एकही सांस्कृतिक सभागृह नाही, मोठे सिनेमागृह नाही तरीही जिल्हा करमणूक कर भरण्यात जिल्हा आघाडीवर असलेल्याचे दिसून आले आहे.

दोनच मोठ्या कार्यक्रमांची नोंदमहेश सायखेडे वर्धाजिल्ह्यात एकही सांस्कृतिक सभागृह नाही, मोठे सिनेमागृह नाही तरीही जिल्हा करमणूक कर भरण्यात जिल्हा आघाडीवर असलेल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या करमणुकींच्या साधनांतून मिळणाऱ्या कराच्या उद्दिष्टापैकी ८० टक्के म्हणजेच १ काटी ८३ लाख ६९ हजार रुपयांची वसुली केल्याची माहिती आहे. ही वसुली जिल्ह्यात कुठलीही विशेष करमणूक सुविधा नसताना झालेली जिल्ह्याची खरी कमाई ठरत आहे. उर्वरीत २० टक्के वसुली करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित विभागाचे अधिकारी कार्यरत असल्याची माहिती आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाला जमीन महसूल, गौणखनिज व करमणूक करातून मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होतो. यात करमणूक कराचा मोठा वाटा असल्याचे या वसुलीवरून दिसून आले आहे. चित्रपटगृह, गेम पार्लर, आयोजित करण्यात येणारे मोठे उत्सव व केबल एजन्सी धारक यांच्याकडून करमणूक कर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वसुल केल्या जातो. जिल्ह्यात २४७ अधिकृत केबल एजन्सी धारक आहेत. त्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या घरी सेटटॉपबॉक्स देण्यात आले आहे. त्यांच्याकडूनच त्याचा कर वसुल केल्या जात आहे. तर १८ गेम पार्लर आहे. त्यांच्याकडून या विभागाच्यावतीने कराची वसुली होत असल्याचे समोर आले आहे. या व्यतिरिक्त सात चित्रपटगृह असल्याची नोंद आहे. यातील दोन टुरींग चित्रपटगृह असल्याचे सांगण्यात आले. सन २०१६-१७ या वर्षात जिल्ह्यात कला महोत्सव व रोटरी फेस्टीवल हे मोठे कार्यक्रम झाल्याची नोंद आहे. सन २०१६-१७ या वर्षात जिल्ह्याला २३० लाखांचा करमणूक कर वसुलीवे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १ कोटी ८३ लाख ६९ लाख रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. त्याची सरासरी ८० टक्के असून करमणूक कराचा भरणा न करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.२०१५ मध्ये ११० टक्के वसुलीआर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये जिल्ह्याला १.७५ कोटी, २०१४-१५ मध्ये १.९५ कोटी, २०१५-१६ मध्ये २ कोटी तर २०१६-१७ मध्ये २.३० कोटींचे उद्दिष्ट होते. २०१३-१४ मध्ये १.७४ कोटी ९१.१८ टक्के, २०१४-१५ मध्ये २.४७ कोटी ११० टक्के, २०१५-१६ मध्ये २.१९ कोटी १०९.८० टक्के तर २०१६-१७ मध्ये १.८३ कोटी ८० टक्के करमणूक कर वसूल झाला. थकित २० टक्के कर वसूल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचा करमणूक कर विभाग प्रयत्नशील आहे.अन्यथा दंडात्मक कारवाईथकित करमणूक कर ३१ मार्चपर्यंत भरण्याबाबत थकबाकीदारांना नोटीस बजावली आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्यावर महाराष्ट्र करमणूक शुल्क अधिनियम १९२३ सुधारणा २०१५ नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे करमणूक विभागाने सांगितले.यंदा वर्धा तालुक्याला १.४२ कोटी, सेलू १३.५० लाख, देवळी १२.५ लाख, हिंगणघाट ३८ लाख, समुद्रपूर ४.२५ लाख, आर्वी १४.५० लाख, आष्टी (श.) ३.२५ लाख, कारंजा (घा) तालुक्याला १९.७५ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. पैकी १७ मार्चपर्यंत वर्धा ८०.०३ लाख, सेलू ९.०१ लाख, देवळी १०.५० लाख, हिंगणघाट २७.८६ लाख, समुद्रपूर ३.८४ लाख, आर्वी ९.५३ लाख, आष्टी (श.) ३.२९ लाख तर कारंजा (घा) तालुक्याने ७६ हजारांच्या करमणूक कराची वसुली केली आहे.