147 शाळा अनलॅाक;3 हजार 551 पालकांनी दिली संमती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 05:00 AM2020-11-26T05:00:00+5:302020-11-26T05:00:15+5:30

 जिल्ह्यातील आठही तालुक्यात ९ ते १२ वी पर्यंतच्या एकूण ३५८ शाळा असून यामध्ये तब्बल ७० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्याकरिता २ हजार २०० शिक्षक तर १ हजार १०० कर्मचारी कार्यरत आहे. या सर्व ३ हजार ३०० शिक्षक कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी अनिवार्य करुन १७ नोव्हेंबरपासून चाचणीला सुरुवात झाली. आतापर्यंत ३ हजार २२५ शिक्षक, कर्मचाऱ्यांची चाचणी पूर्ण झाली आहे.

147 schools unlocked; consent given by 3 thousand 551 parents | 147 शाळा अनलॅाक;3 हजार 551 पालकांनी दिली संमती

147 शाळा अनलॅाक;3 हजार 551 पालकांनी दिली संमती

googlenewsNext
ठळक मुद्देशिक्षण विभागाकडून आढावा : विद्यार्थ्यांमध्ये वाढतोय उत्साह

 लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्यभरातील शाळांचे अर्धे शैक्षणिक सत्र उलटल्यानंतर २३ नोव्हेबरपासून ९ ते १२ वी पर्यंतच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे सुरु करण्याचे निर्देश दिलेत. त्यानुसार जिल्ह्यातील गेल्या तीन दिवसात १४७ शाळा सुरु झाल्या असून या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठविण्याकरिता ३ हजार ५५१ पालकांनी संमती दिल्याने सर्व विद्यार्थी वर्गात उपस्थित राहात आहे.
 जिल्ह्यातील आठही तालुक्यात ९ ते १२ वी पर्यंतच्या एकूण ३५८ शाळा असून यामध्ये तब्बल ७० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्याकरिता २ हजार २०० शिक्षक तर १ हजार १०० कर्मचारी कार्यरत आहे. या सर्व ३ हजार ३०० शिक्षक कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी अनिवार्य करुन १७ नोव्हेंबरपासून चाचणीला सुरुवात झाली. आतापर्यंत ३ हजार २२५ शिक्षक, कर्मचाऱ्यांची चाचणी पूर्ण झाली आहे. शाळा व्यवथापन समिती, पालक यांची संमती घेऊन शाळेत कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करीत शाळांचा पहिला ठोका दिला. आता हळूहळू शाळा सुरु होण्याचे प्रमाण वाढले असून विद्यार्थ्यांची उपस्थितीही वाढायला लागली आहेत.

स्वॅब टेस्टमुळे शिक्षकांची संख्या कमी
शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी करणे बंधनकारक केल्यामुळे आतापर्यंत ९७ टक्के शिक्षकांची चाचणी पूर्ण झाली असून ६७ शिक्षक, कर्मचारी बाधित आढळले. तर काहीची प्रकृती ठिक नसल्याने उपस्थिती कमी असल्याचे दिसून येत आहे.

पालकांची संमती मिळालयला लागली आहे. सोबतच शाळा व्यवस्थापन समितीचेही सहकार्य असल्याने शाळा टप्याटप्यात सुरु होत आहे. सुर्व सोयी- सुविधा पुरवित शाळांकडून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. १ डिसेंबरपर्यंत सर्व शाळा सुरु होतील.
- डॅा. मंगेश घोगरे,           शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

Web Title: 147 schools unlocked; consent given by 3 thousand 551 parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.