शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

आता महाकुंभमेळ्यात दिसले ‘कांटे वाले बाबा', 50 वर्षांपासून करतायत काट्यांवर तपश्चर्या! म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 14:09 IST

हे बाबा काट्यांवरच साधना करतात, यामुळेच त्यांना 'कांटे वाले बाबा', म्हटले जाते. ते गेल्या ५० वर्षांपासून दरवर्षी अशी साधना करत आहेत.

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यादरम्यान कोट्यवधी भाविक दाखल झाले आहेत. येथे श्रद्धेची वेगवेगळी रुप बघायला मिळत आहेत. अगदी स्प्लेंडर बाबापासून ते आयआयटीयन बाबापर्यंत पर्यंत, अनेक जण चर्चेत आहेत. यातच आता सोमोर आले आहेत 'काँटे वाले बाबा'. त्यांचा व्हिडिओ इंटरनेटवर जबरदस्त व्हायरल होत आहे. त्यांचे नाव रमेश कुमार मांझी असे आहे.  त्यांच्या साधना करण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे ते सध्या जबरदस्त चर्चेत आहेत. आकर्षणाचे केंद्र बनले आहेत.

हे बाबा काट्यांवरच साधना करतात, यामुळेच त्यांना 'कांटे वाले बाबा', म्हटले जाते. ते गेल्या ५० वर्षांपासून दरवर्षी अशी साधना करत आहेत. तसेच आपल्याला या काट्यांपासून कसलही इजा होत नाही, असेही सांगतात. यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, "मी गुरुंची सेवा करतो. गुरुंनी आम्हाला ज्ञान दिले, आशीर्वाद दिले. हा सर्व देवाचा चमत्कार आहे. मी गेल्या ४०-५० वर्षांपासून दरवर्षी अशा पद्धतीने साधना करतो."

बाबांनी म्हटले आहे की, "आपण उज्जैन, हरिद्वार, नाशिक आणि गंगासागरलाही भेट देतात. मला फायदा होतो म्हणून मी हे करतो. यामुळे मला कधीही त्रास होत नाही." पुढे ते म्हणाले, "मी दिवसाला हजार रुपये कमवतो. मिळणाऱ्या दक्षिणेतील अर्धी रक्कम मी जन्माष्टमीला देईल आणि उरलेली माझ्या खर्चासाठी वापरेन.”

दरम्यान, 10 देशांच्या 21 सदस्यांचे प्रतिनिधिमंडळ बुधवारी सायंकाळी प्रयागराजमधील अरेल टेंट सिटीमध्ये पोहोचले. यांत फिजी, फिनलंड, गयाना, मलेशिया, मॉरिशस, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) चे प्रतिनिधी आहेत. यांनी आज संगमावर स्नान केले. दौऱ्यादरम्यान हे प्रतिनिधिमंडळ प्रयागराजची समृद्ध सांस्कृती आणि ऐतिहासिक वारसा समजून घेण्यासाठी हेरिटेज वॉकमध्येही भाग घेईल. 13 जानेवारीपासून सुरू झालेला हा कुंभमेळा 26 फेब्रुवारीपर्यंत चालेल. 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेश