शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

गोंधळात गोंधळ! BJP उमेदवार समजून कार्यकर्त्यांनी दुसऱ्याच व्यक्तीचे केले स्वागत, पाहा video

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 5:49 PM

Lok Sabha Election: भाजपचे लोकसभा उमेदवार स्टेशनवर उतरले, मात्र कार्यकर्त्यांनी दुसऱ्याच व्यक्तीचे जंगी स्वाग केले.

Kanpur Lok Sabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशातील कानपूरमधून रमेश अवस्थी यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाने विद्यमान खासदार सत्यदेव पचौरी यांना डच्चू देत अवस्थींवर विश्वास दाखवला. दरम्यान, अवस्थी यांच्यासोबत कानपूर रेल्वे स्टेशनवर एक विचित्र घटना घडली. तिकीट जाहीर झाल्यानंतर ते पहिल्यांदाच रेल्वेद्वारे कानपूर स्टेशनवर उतरले. यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा घोळ घातला.

रमेश अवस्थी यांच्यासाठी स्टेशनवर मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते जमले होते. शताब्दी एक्स्प्रेस स्टेशनवर थांबताच उत्साही कार्यकर्ते स्वागतासाठी बोगीकडे धावले. यावेळी ट्रेनमधून अवस्थी यांच्या आधी भलताच व्यक्ती खाली उतरला. गोंधळून गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीलाच रमेश अवस्थी समजून पुष्पहार घालून जंगी स्वागत केले.

काही वेळाने घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना रमेश अवस्थी मागे असल्याचे समजले. यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना पुष्पहार घालण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजपचे कार्यकर्तेही आपला नवा उमेदवार ओळखू शकले नाहीत, असा टोला नेटकरी लगावत आहेत.  दरम्यान, रमेश अवस्थी समजून ज्या व्यक्तीला पुष्पहार घातला, ते दुसरे तिसरे कोणी नसून भाजपचेच राज्यसभा खासदार बाबू राम निषाद होते.  कोण आहेत रमेश अवस्थी ?यावेळी भाजपने कानपूर लोकसभा मतदारसंघातून सत्यदेव पचौरी यांचे तिकीट कापून, रमेश अवस्थी यांच्यावर बाजी लावली आहे. रमेश अवस्थी हे ज्येष्ठ पत्रकार राहिले आहेत. नुकताच त्यांनी सहारा समूहाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर भाजपनेही त्यांना कानपूरमधून लोकसभेचे तिकीट दिले. कानपूर लोकसभा जागेसाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे, तर मतमोजणी 4 जून रोजी होईल. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश