प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 16:47 IST2024-09-27T16:47:15+5:302024-09-27T16:47:37+5:30

एका तरुणाने प्रेयसीसाठी जे केले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला.

  A law student has been arrested for stealing for his girlfriend in Uttar Pradesh's Lucknow | प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला

प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला

प्रेमात कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना केली जाऊ शकत नाही असे बोलले जाते. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथून याचाच प्रत्यय देणारी एक घटना समोर आली. इथे एका तरुणाने प्रेयसीसाठी जे केले ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. आपल्या प्रेयसीला नवनवीन भेटवस्तू देण्यासाठी तो चोरी करत असे. यातून मिळालेल्या पैशांतून तो प्रेयसीला तिच्या आवडीच्या वस्तू भेट म्हणून द्यायचा. विशेष बाब म्हणजे केवळ प्रेयसीचा खर्च भागवण्यासाठी त्याने चोरी करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याच्यावर अटकेची कारवाई केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनौ येथील गोमती नगर परिसरात राहणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांना त्याची माहिती मिळाली. तो मूळचा जौनपूर येथील रहिवासी असून, अब्दुल हलीम असे त्याचे नाव आहे. तो गोमती येथे वास्तव्यास असून, कायद्याचे शिक्षण घेत आहे. चोरी करताना तो सापडताच त्याने प्रेयसीसाठी चोरी करत असल्याचे पोलिसांना सांगितले.

आरोपीवर अटकेची कारवाई 
आरोपी अब्दुलने एकाच दिवशी तीन घरांमध्ये चोरी केली होती. प्रेयसीला मॉलमध्ये फिरायची आवड आहे, नवीन वस्तूंची शॉपिंग करणे, आयफोन खरेदी करणे आणि क्लबमध्ये जाण्यासाठी पैशांची गरज भासायची. प्रेयसीसोबत चित्रपट पाहायला जातावेळी पैशांची कमतरता जाणवायची म्हणून हा मार्ग अवलंबवला. प्रेयसीच्या सर्व मागण्या पूर्ण करता याव्या म्हणून चोरी हाच एक पर्याय समोर होता, असे आरोपीने सांगितले. आरोपीकडून काही वस्तू आणि रक्कम जप्त करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी साउथ जोन केशव यांनी सांगितले की, आरोपी कायद्याचे शिक्षण घेत आहे. चोरी करतानाचा त्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याला अटक करण्यात आली असून, पुढील चौकशी सुरू आहे.

Web Title:   A law student has been arrested for stealing for his girlfriend in Uttar Pradesh's Lucknow