शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

लाऊडस्पीकर लावून  शाळेचा अभ्यास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 07:30 IST

onlineशाळा म्हणजे असतं तरी काय?

ठळक मुद्देशाळेत न जाता घरी बसून ऑनलाईन शिकता येत का?

 बाकी सगळ्यांच्या शाळा बंद आहेत, पण आजही त्यांची शाळा मात्र सुरूच आहे. ते शिक्षक रोज शाळेत येतात.पण शाळेत मुले नसतातच. मुले आपापल्या घरी असतात. मग ते शिक्षक ग्रामपंचायत मध्ये बसवलेला स्पीकर सुरु करतात आणि सुरु होतो शाळेचा परिपाठ. या स्पीकरवर राष्ट्रगीत वाजवले जाते आणि बोधकथा देखील सांगितली जाते. दुपारी जेवणाच्या वेळी बडबड गीते देखील वाजवली जातात . .. किती भारीय न हे !  ग्रामपंचायतमधील  या स्पीकरचा आवाज गावातील प्रत्येक घरात ऐकू जाईल याची व्यवस्था ग्रामपंचायतीने केली आहे.  रोज काय शिकवणार याची घोषणा आदल्या दिवशी रात्री केली जाते. वर्कशीट ची झेरॉक्स  मुलांना आदल्या दिवशी दिली जाते. आणि मग रोज सकाळी 9 ते 1 या वेळेत ही शाळा भरते. घनशाम भाई नावाचे हे शिक्षक गुजरात मधील कच्छ जिल्ह्यातील जनान गावातील सरकारी शाळेतील मुलांना शिकवण्याचे काम करतात.भारत-पाकिस्तान सीमेवर हे गाव आहे.  काही जण मला विचारात होते कि, तुम्ही  ऑनलाईन शाळा भरवू शकता कारण तुमच्या शाळेतील प्रत्येक मुलाकडे स्मार्ट फोन आहे. पण आमच्याकडे नाहीये, मग आम्ही कसे जाणार ऑनलाईन शाळेत?  - पण म्हणतात न कि इच्छा असली कि मार्ग सापडतोच. घनशाम भाई यांनी किती सोपा पर्याय वापरून शाळा सुरूच ठेवलीय. यासाठी ना इंटरनेट गरजेचं  ना स्मार्ट फोन.  मुलांनो, एक लक्षात घ्या शिकण्यासाठी साधनांपेक्षा शिकण्याची मानसिकता महत्वाची आहे.मग आहात ना तुम्ही तयार ऑनलाईन शाळेत जायला?